शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

जिपचा उपअभियंता आणि लेखापाल ६ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 6:23 PM

Deputy engineer and accountant of ZP caught red handed by ACB Beed हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नाली बांधकामाचे बिल देण्यासाठी घेतली लाच

ठळक मुद्देलेखापाल मिठेवाड व गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

माजलगाव  : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा परिषदेच्या उपअभियंता हिरामण गालफाडे व लेखापाल रमेश मिठेवाड यास बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  रंगेहात पकडले. माजलगाव येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, याच कार्यालयातील उपअभियंता बहीर यास ३ महिन्यांपूर्वी १० हजारांची लाच घेताना पकडले होते. त्या रिक्त जागेचा पदभार गालफाडे यांना देण्यात आला होता व तेही एसीबीच्या जाळ्यात अडकले.

माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्यावतीने मतदार संघातील हिंगणी बुद्रुक या गावातील रस्त्याचे व नाली बांधकामाचे काम पूर्ण झाले होते. मात्र, याचे बिल देण्यासाठी संबंधित ठेकेदाराला उपअभियंता गालफाडे हे १२ हजार रुपये टक्केवारी मागत होते. परंतु, टक्केवारी देण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शवली. शेवटी ६ हजार रुपये देतो असे म्हणून तडजोड केली. त्यानंतर बीडलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ठेकेदाराने तक्रार दाखल केली. त्यानुसार बुधवारी दुपारी पंचायत समिती आवारात असलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा लावला. यावेळी लेखापाल मिठेवाड व गालफाडे यांना सहा हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सखाराम घोलप, अमोल बागलाने, विजय बरकसे यांनी केली. याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एसीबीचे पथक दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेत आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीड