शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:45 PM

गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले.

बीड : गेल्या चाळीस वर्षापासून देशात सांप्रदायिक आणि नारदीय कीर्तन सेवा देणारे राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी (वय ५७ वर्षे) यांचे २९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने देहावसान झाले. भरतबुवांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, नात, दोन भाऊ, भावजई आदी परिवार आहे.वारकरी सांप्रदायाची पताका गेल्या अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे सांभाळणाऱ्या भरतबुवांनी बीड येथील स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठाणचा कीर्तन महोत्सव देशभरात पोहचवला. मागील सोळा वर्षापासून ते या महोत्सवाचे उत्कृष्ट संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. भरतबुवांच्या निधनाने सांप्रदायीक चळवळीची मोठी हानी झाली आहे.संत चरित्राचे गाढे अभ्यासक असलेले रामदासी यांना शनिवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करु न त्यांना मृत घोषित केले. भरतबुवांच्या अकाली निधनाची वार्ता वाºयासारखी शहरभर पसरली अनेकांना त्यांच्या निधनाने धक्का बसला. माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व क्षेत्रातील नागरिकांनी, प्रतिष्ठितांनी गर्दी केली होती. भरतबुवा रामदासी हे मुळचे रुई धानोरा (ता.गेवराई) येथील रहिवासी असून बीड शहरातील सराफा रोडवरील राममंदिर गल्लीत ते वास्तव्यास होते. गेल्या चाळीस वर्षापासून देशभरात सांप्रदायिक, वारकरी आणि नारदीय कीर्तन सेवा केली आहे. बीडचे नाव सांप्रदायिक चळवळीच्या माध्यमातून देशाच्या पटलावर पोहचवण्यात भरतबुवांचा सिंहाचा वाटा होता.रविवारी सकाळी अंत्यसंस्कारभरतबुवा रामदासी यांच्या पार्थिवावर १ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील मोंढा रोडवरील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी सराफा लाईन, राम मंदिर गल्ली येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.लोकमत आॅनलाईनचे भरतबुवा लिहायचे अध्यात्मलोकमत आॅनलाईनवर हभप भारतबुवा रामदासी हे नियमित आठवड्याला अध्यात्म या सदरातून समाजप्रबोधन करत असत. अतीशय स्पष्ट, सुलभ भाषेत दाखले देत ते अंधश्रद्धा, वाईट गोष्टीवर घणाघाती लिहित असत. त्यांनी लोकमत आॅनलाईनवर ५५ लेख लिहिले. शेवटचा लेख २२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला. ते नेहमी दोन लेख अ‍ॅडव्हान्समध्ये देत असत. यावेळी मात्र त्यांनी २२ फेब्रुवारीपर्यंतचाच लेख दिला. त्यांचे लिखाण असो की कीर्तन, प्रवचन, त्यास वाचकवर्ग, श्रोतावर्ग होता. लिखाण आणि वाणीवर त्यांचे प्रभूत्व होते.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू