लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यूही होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी काही लोकांनी घरी राहून उपचार घेत कोरोनावर मात केली आहे. असेच बीड शहरातील संगीता क्षीरसागर यांच्या कुटुंबाने कोरोनाला घरी राहून लोळवले आहे.
संगीता क्षीरसागर यांचे वय ५५ आहे. तरीही त्यांनी कोरोना वॉर्डमध्ये कर्तव्य बजावले. याच दरम्यान त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्यांचे पती व दोन मुलेदेखील बाधित आढळले. संगीता दोन दिवस आयसीयूमध्ये उपचार घेऊन नंतर हाेम आयसोलेट झाल्या. घरीच औषधी घेऊन त्यांनी आज कोरोनावर मात केली आहे. आता दोन दिवसांत त्या पुन्हा रुग्णसेवेसाठी जिल्हा रुग्णालयात येणार आहेत. मेट्रन संगीता दिंडकर, डॉ. सुमित मसुरे, राजू औचरमल, परसेविका, कॉलमन यांनीही त्यांना आधार दिला.
आमची एकजूटता हीच आमची शक्ती....औषधांसह मानसिक आधारदेखील महत्त्वाचा
माझे वय ५५ आहे. कोरोनाकाळात कर्तव्य बजावले आहे. २९ वर्षे सेवा पूर्ण झाली आहे. ही सेवा करतानाच मला थोडा ताप जाणवला. सकाळी ड्युटी करून आल्यावर चाचणी केली. १६ एप्रिलला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कुटुंबातील सर्व सदस्यही पॉझिटिव्ह होते. आता आम्ही कोरोनामुक्त झालो.
- संगीता क्षीरसागर
पत्नी जिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा करते. त्यामुळे संशयित व बाधितांच्या संपर्कात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तिचा संपर्क येतच होता. आज ना उद्या आम्ही पॉझिटिव्ह येणार हे माहितीच होते. अखेर आम्ही पॉझिटिव्ह आलोच, पण आम्ही लस घेतली होती. त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. भीती बाळगू नये.
- दिलीप क्षीरसागर
आई-वडिलांनी चाचणी केली. माझा अहवाल थोडा उशिरा आला, पण मला कसलेच लक्षणे नव्हते. तरीही होम आयसोलेट असताना गोळ्या, औषधी घेतली. नियमित काढा पिणे आणि वाफ घेत होतो. घरात १० दिवस कोणालाच येऊ दिले नाही. घर पूर्ण सॅनिटाईज करून घेतले होते.
- अक्षय क्षीरसागर
सर्दी, अंगदुखी, ताप अशी लक्षणे होती. सुरुवातीला थोडी भीती होती, पण आता आम्ही सगळे कोरोनामुक्त झाल्याने आनंदी आहोत. होम आयसोलेट असताना नातेवाइकांनीही काळजी घेतली. अनेकांनी आधार दिला. औषध उपचाराबरोबरच मानसिक आधारदेखील महत्त्वाचा आहे.
- स्नेहा क्षीरसागर
===Photopath===
290421\29_2_bed_19_29042021_14.jpg
===Caption===
बीड शहरातील रहिवाशी असलेल्या आणि जिल्हा रूग्णालयातील इन्चार्ज संगिता क्षीरसागर यांच्या कुुटूंबाने घरी राहून कोरोनावर मात केली.