अरुंद रस्त्यामुळे कोंडी
बीड : शहरातील भाजीमंडईत असलेले अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
नियंत्रणाची मागणी
गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. अवैध वाळू माफियांवर नियंत्रण ठेवून कडक कारवाईची मागणी होत आहे.
सर्रास विक्री सुरूच
वडवणी : राज्य शासनाकडून गुटखा विक्रीवर प्रतिबंध आहे. मात्र, शहर आणि परिसरातील गावात सहजरीत्या गुटखा उपलब्ध होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधिताने लक्ष देण्याची मागणी होत आहे.