बीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अनोखा सोहळा बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बीडकरांनी आपल्या डोळ्यात साठवला. महिलांची प्रचंड उपस्थिती ही या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. चार राज्यातील तब्बल एक हजारपेक्षा अधिक कलाकारांनी आणि स्थानिक कलावंतांनी आपली कला सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.अद्भुत, अद्वितीय अनोखा असा हा सोहळा बीडकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ पाहून आपल्या लाडक्या राजाला अभिवादन केले. याप्रसंगी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आ.संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या शिवजयंतीला अगळं वेगळं रूप दिलं. मागच्या वेळी एक वाक्य बोललो होतो. बीडच्या मायमाऊलींनी आशीर्वाद दिले आणि संदीप आमदार झाले. आजपर्यंत जो विकास झाला नाही, तो विकास एका येत्या पाच वर्षात आम्ही करू, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर २०२० च्या वतीने भव्य अशा मिरवणुकीचे आयोजन आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी अमरसिंह पंडित, शिवाजी सिरसट, बजरंग सोनवणे, सय्यद सलीम, सुनील धांडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.श्वास असेपर्यंत शिवजयंती साजरी करणार : संदीप क्षीरसागरछत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून साजरा करत असतांना बीडकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. श्वासात श्वास असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत राहिल, असे प्रतिपादन आपल्या प्रस्ताविकात आ. संदीप क्षीरसागर यांनी केले.
बीडचा विकास करणार : धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:04 AM
बीड : रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा अनोखा सोहळा बीडचे आ.संदिप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो बीडकरांनी आपल्या ...
ठळक मुद्देशिवजयंती महोत्सव : उत्स्फूर्त प्रतिसाद, कलाकारांनी मने जिंकली