शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 4:25 PM

भगवान पुरुषोत्तमाची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली

माजलगाव : तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे मंगळवारी अधिक मास प्रारंभ निमित्ताने भगवान पुरुषोत्तमाची विधीवत महापूजा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याहस्ते करण्यात आली.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, तहसीलदार वर्षा मनाळे यांचीही उपस्थिती होती.

दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास ( धोंड्याचा महिना) मंगळवार पासुन सुर झाला आहे.या महिनाभरात पुरुषोत्तमपुरी येथे भगवान विष्णूचा अवतार पुरुषोत्तम दर्शनासाठी महत्त्व आहे. भारतात एकमेव असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक या महिन्याभरात या ठिकाणी गर्दी करतात.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते  अभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मुधोळ यांच्यासह शल्यचिकित्सक सुरेश साबळे ,तहसीलदार वर्षा मनाळे यांचा सत्कार समितीचे वतीने अध्यक्ष विजय गोळेकर,उपाध्यक्ष दिगंबर कोरडे,बाबासाहेब गोळेकर,माजी सरपंच भाऊसाहेब गोळेकर व ग्रामस्थांनी केला.दरम्यान अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शन बारीमध्ये रांगा लावून दर्शन घेतले. मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील महिला भाविकांची संख्या मोठी दिसून आली.जवळपास २० हजार भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने प्रशासन व मंदिर ट्रस्ट यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.

टॅग्स :Beedबीड