बीड : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस धावत नसल्याने बसस्थानक ओस पडले आहे. महिन्यापासून बसस्थानकातून बस सुटली नाही. त्यामुळे गजबजणारे स्थानक ओस पडले आहे.
धुम्रपानावर बंदीची गरज
बीड : आहाराच्या बदलत्या सवयी, अमली पदार्थाचे मोठ्या प्रमाणात केले जाणारे सेवन, मद्यपान, धूम्रपान यांमुळे अनेक गंभीर परिणाम समोर येत आहेत. वातावरणातील बदलांमुळे खासगी रुग्णालयांमध्येही गर्दी वाढू लागली आहे. यावर निर्बंधांची मागणी होत आहे.
जिल्ह्यात हलका पाऊस
बीड : जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच वादळी वारा व हलक्या पावसामुळे अनेक ठिकाणी आंब्याचे व फळबागांचे नुकसान होत आहे. आधीच शेतकऱ्यांना रबी, खरीप हंगामातही नुकसानीला तोंड द्यावे लागले होते.
गुटखा विक्रीतून लूट
अंबाजोगाई : तंबाखू, गुटखा व सिगारेटवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध आणले असता या सर्व वस्तूंचे भाव तिप्पट, चौपट वाढले. बंदीत शौकिनांची मोठी लूट सुरू असून, छुप्या मार्गाने धूम्रपानाच्या वस्तूंची विक्री बिनधास्तपणे सुरूच आहे. यावर बंदीची मागणी होत आहे.
लसीकरणाचे आवाहन
बीड : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम जोमाने सुरू आहे. मध्यंतरी लसीची मोहीम मंदावली होती. मात्र, आता पुन्हा लस आल्याने लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचे आवाहन आहे.