लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : सकारात्मक असणे हे बौद्ध माणसाचे लक्षण आहे. अंधश्रद्धा दूर करून बुद्ध व बाबासाहेबांना जवळ करा, भारतीय संविधान वाचवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पु.भदन्त उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांनी केले.परळी तालुक्यातील चांदापूर येथे शनिवारी सकाळी पाचव्या बौद्धधम्म परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित उपासक व उपासिकांना धम्म देसना देताना पू.भदन्त उपगुप्त महाथेरो यांनी मार्गदर्शन केले.या धम्म परिषदेला पू. भिक्खू ज्ञानरक्षित (औरंगाबाद), पू. भिक्खू पय्यारत्न (नांदेड), पू.भिक्खू धम्मशील (हिंगोली), पू. भिक्खू प्रज्ञानंद (नागपूर), पू.भिक्खू शरणंकर थेरो (हैद्राबाद), पू. भिक्खू धम्मसेवक थेरो यांची उपस्थिती होती. या धम्म परिषदेला धम्मप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदविला.यावेळी पू.ज्ञानरक्षित महाथेरो यांनी बाबासाहेबांचा विचार कृतीतून पुढे नेणाऱ्या, वंचितांसाठी संघर्ष करणा-या नेतृत्वाला मतदानरूपी ताकद देण्याचे व धम्म आचरण करणारी माणसे संसदेत पाठविण्याचे आवाहन केले.प्रारंभी सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने करण्यात आली. स्वागताध्यक्षपदी ओबीसी परिषदेचे राज्य अध्यक्ष संदीप उपरे होते. अध्यक्षस्थानी प्रा.प्रदीप रोडे तर धम्मपीठावर अॅड.अनंतराव जगतकर, सरपंच मनोहर केदार , प्रा.डॉ.विनोद जगतकर आदी उपस्थित होते.प्रारंभी पू.भिक्खू शरणंकर थेरो (नागपूर), पू.भिक्खू प्रज्ञानंद (औरंगाबाद), पू.भिक्खू धम्मशिल (हिंगोली), पु.भिक्खू पय्यारत्न थेरो (नांदेड) आदींनी अंबाजोगाई, परळी,बीड, कळंब, लाडेवडगाव, चांदापूर, मानेवाडी, घाटनांदूर येथून आलेल्या बौद्ध उपासक उपासिकांना धम्मदेसना दिली. प्रा. प्रदीप रोडे यांनी जीवन जगण्याची आदर्श पद्धत धम्मात सांगितल्याचे नमुद करून भारताला महासत्ता करण्यासाठी बुद्ध व बाबासाहेबांची खरी गरज असल्याचे े ते म्हणाले. प्रा.गौतम गायकवाड यांनी १७ ठरावांचे वाचन केले.या धम्म परिषदेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०१७-१८ प्राप्त केशव गोरोबा कांबळे (लातूर) आणि त्रिवेणी कसबे-पोटभरे (संयोजक, बुध्द सृष्टी विपश्यना केंद्र, कळंब), सामाजिक क्षेत्रात सामाजिक न्याय विभागाचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल केशव कांबळे, अभियांत्रिकीच्या विद्युत शाखेतून डॉ.बा.आं.म. विद्यापीठातून प्रथम व सुवर्णपदक पटकावणा-या अनुष्का दामोदर सोनवणेचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन जगन सरवदे यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र घोडके यांनी केले. प्रा.बी.एस. बनसोडे, लंकेश वेडे, सुखदेव भुंबे, धम्मानंद मुंढे, सुभाष वाघमारे, प्रा.आर.एच. व्हावळे, रघुनंदन खरात यांचेसह बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यातील उपासक, उपासिका श्वेत वस्त्र परिधान करून या परिषदेस उपस्थित होते. परिषदेच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत इंगळे, राजेंद्र घोडके, राहुल घोडके, जगन सरवदे,सचिन वाघमारे,विश्वनाथ भालेराव,सिमा चंद्रकांत, मिलिंद नरबागे इंगळे, सुरेखा प्रल्हाद रोडे, प्रा.गौतम गायकवाड, मुरलीधर कांबळे, सुनंदा शिंदे, आकाश वेडे, मधुकर वेडे आदींनी परिश्रम घेतले.
धम्म आचरणाने भारतीय लोकशाही मजबूत- ज्ञानरक्षित महाथेरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:52 AM