- संजय खाकरेपरळी (बीड) : तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या सरपंच व सदस्य पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे व भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकानी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे .गेल्या आठ दिवसापासूनच गावागावात निवडणुकीचे वातावरण चांगले तापू लागले आहे, आ.धनंजय मुंडे यांनी आपल्या आघाडी च्या सत्तेच्या काळात ग्रामीण भागात विकास कामासाठी निधी दिला असल्याने त्यांचे समर्थक गावागावातील प्रभागात पोहोचले आहे तर ग्रामीण भागात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे भाजपला मानणारा मोठा वर्ग आजही कायम आहे. त्यातच पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असतानाही ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकास कामासाठी दिलेले योगदानही भाजपच्या कार्यकर्त्यांना फायद्याचे ठरणार आहे
त्यामुळे मुंडे बहीण- भावांच्या समर्थकात ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूकित आता टाईट फाईट होणार आहे. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठका माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या आहेत तर पंकजा मुंडे यांनी ग्रामीण भागाचा एक दौरा पूर्ण केला आहे तसेच सोमवारपासून त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडून पूर्वीपासूनच बळ मिळाले आहे त्यामुळे गावागावात त्यांचे कार्यकर्ते स्ट्रॉंग पणे निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत तर भाजपचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने कामाला लागले चित्र पहावयास मिळत आहे.
2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या मुंडे बंधू भगिनींसाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याने त्यांनीही ग्रामपंचायतकडे पूर्णता लक्ष देण्याचे ठरविले आहे , ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर काही गावातील कार्यकर्ते पक्षांतर करीत आहेत,त्यामूळे 80 ग्रांमपचायत मध्ये निवडणुकीचे वातावरण तापू लागलं आहे, भाजप व राष्ट्रवादीच्या समर्थकांनी आपली प्रतिष्ठा पणा ला लावून ग्रामपंचायत जिंकायचीच असा चंग केला आहे, अनेक ग्रामपंचायती मध्ये जवळचे नातेवाईक ,व भावकीच्या निवडणुका पहावयास मिळणार आहेत,तर बिनविरोध निवडुकी चे दुर्मिळ असेल असे जाणकार सांगतात.