माजलगाव : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयासमोर सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवारी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले.
राज्यात ४३ हजार धनगड समाज आहे तर बीड जिल्ह्यात ४०९ धनगड समाज असल्याचे महाराष्टÑ शासनाचे म्हणणे आहे. परंतु महाराष्टÑातील सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालये तसेच जात पडताळणी समितीकडून माहितीच्या अधिकाराखालील माहितीत महाराष्ट्रात एकही धनगड नसल्याची लेखी माहिती देण्यात आली. महाराष्ट्रात धनगड समाज नसून जर असेल तर त्यांचे पत्ते व कुटुंब पत्रके मिळावीत. जर जिल्ह्यात धनगड समाज नसेल तर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. तहसीलअंतर्गत अंतर्गत धनगड नसतील तर संबंधित तहसीलदारांनी धनगड नसल्याचे लेखी द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे.