लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे चक्क ‘एसी’च्या खोलीत जुगार अड्डा चालविला जात होता. याच अड्ड्याचा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला. यामध्ये अडीच लाख रूपयांच्या मुद्देमालासह २० जुगारी ताब्यात घेतले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईमुळे परळी ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.अंबाजोगाई उपविभागातील अवैध धंद्यांकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत होते. हाच धागा पकडून विशेष पथकाने सापळा लावला. सोमवारी अंबाजोगाई शहरात एक मोठी कारवाई केल्यानंतर मंगळवारी धर्मापुरीत सापळा लावला. दुपारपासूनच पथक अड्ड्याचा शोध घेत होते. सायंकाळच्या सुमारास एका एसीच्या खोलीत जुगार खेळला जात असल्याची खात्री उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे यांना मिळाली. त्यांनी चमुसह छापा मारला आणि सर्व जुगाऱ्यांना त्याचा खोलीत कोंडून टाकले. सर्व मुद्देमाल हस्तगत केल्यावर त्यांना एका वाहनातून परळी ग्रामीण ठाण्यात नेण्यात आले. येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, हनुमान राठोड आदींनी केली.या जुगाऱ्यांवर गुन्हा दाखलबाळु शंकर फड, दिलीप भगवान फड, गंगाधर शंकर फड, गोविंद बालाजी फड, सतिष भिमराव फड, राम नामदेव फड, महादेव सिताराम फड, योगेश देविदास फड, सुरज शिवाजी फड, नवनाथ वैजनाथ फड, अमर मधुकर मुंडे, दीपक मारोती क्षीरसागर, मिलींद परमेश्वर सावंत, चंद्रकांत बालाजी फड, वासुदेव सायस फड, शेख युनूस शेख इस्माईल (सर्व रा.धमार्पुरी ता.परळी), दिनकर शिवराम पाळवदे (येळंब ता.परळी), व्यंकटेश दत्तात्रय जाधव, सतिश शंकरसिंग छानवाळ, महमुद हरुण तांबोळी (सर्व रा.घाटनांदुर, ता.परळी) अशी ताब्यात घेतलेल्या जुगाºयांची नावे आहेत.
धर्मापुरीत ‘एसी’खोलीतील जुगार अड्ड्याचा पर्दाफाश; २० जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 11:46 PM