: तालुक्यात चार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शांततेत ७६.४३ टक्के मतदान झाले. ऊस तोडणी कामगार मोठ्या संख्येने मतदानासाठी आले होते. या टप्प्यात तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी कोथिंबीरवाडीची निवडणूक बिनविरोध झाली होती. जहागीरमोहा, रुईधारूर, कासारी, भोपा या ग्रामपंचायतच्या ३६ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. ३०५३ स्त्री व ३५५७ पुरूष मतदारांनी हक्क बजावला. भोपा येथे सर्वात जास्त ८९ टक्के मतदान झाले. तर जहागीरमोहा ७६.३०, रुईधारूर ७३.०५ तर कासारी ७४.४९ टक्के मतदान झाले. निवडणूक शांततेत होण्यासाठी तहसीलदार वंदन शिडोळकर, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी हे लक्ष ठेवून होते तर पो. नि. सुरेखा धस, सपोनि कानिफनाथ पालवे, उपनिरीक्षक प्रदीप डोलारे ,भालेराव आदी कर्मचारी मतदान केंद्रावर लक्ष ठेवून होते.
धारूरमध्ये ऊस तोडणी कामगारांनीही बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 4:38 AM