येथील वनपरीक्षेत्र कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना लाॉकडाऊननंतर एकत्र येऊन एकजुटीने कार्यालयाचा चेहरा मोहरा बदलला. या कठीण काळाचा सदउपयोग केला. या मेहनतीचे फळ म्हणून हा गौरव झाला. या कार्यालयास प्रमाणपञ देऊन गौरवण्याचा सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमास विभागीय वनअधिकारी एम बी तेंलग, नायब तहसीलदार प्रकाश गोपड, आयएसओ समन्वयक प्रा प्रशांत जोशी, अमोल कांबळे परळीचे वन परीक्षेञ अधिकारी भगवान गिते, धारूरचे वनपरीक्षेञ अधिकारी एम एस मुंडे, वन परीमंडळ अधिकारी एम एस बहीरलवाल, शंकर वरवटे, वनपाल कस्तूरे हे उपस्थित होते.
कार्यालयातील बांधिलकी जपली तर कार्यालय आदर्श बनते यांचे उदाहरण धारूर येथील वनपरीक्षेञ कार्यालय आहे. एकजूटीचे हे यश असून आता दैंनदीन कामात फरक जानवेल असा विश्वास व्यक्त करत आय एस ओ मुल्याकंन करण्याची पध्दत यावेळी प्रशांत जोशी यांनी सांगितली. यावेळी मार्गदर्शन करताना विभागीय वन अधिकारी एम बी तेलंग यांनी हे वनपरीक्षेञ कार्यालय दुर्गम भागातील असताना राज्यात पहिले तालुकास्तरीय कार्यालय आय एस ओ मानाकंन होण्याचा मान मिळवला. नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनीही यावेळी कौतूक करताना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनपरीक्षेञ अधिकारी एम बी मुंडे यांनी तर अाभार वन परीमंडळ अधिकारी शंकर वरवटे यांनी केले.