शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

धोंडे, धसांची प्रतिष्ठा आष्टीत लागली पणाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:40 AM

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : आष्टी विधानसभा मतदार संघाने पोटनिवडणुकीसह चार बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडीच ...

ठळक मुद्देआष्टी  विधानसभा  मतदारसंघ : भाजपाला मताधिक्य देण्याची परंपरा राहणार कायम..

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टी विधानसभा मतदार संघाने पोटनिवडणुकीसह चार बीड लोकसभा निवडणुकीत भाजपाला आघाडीच दिली आहे. भाजपाचा हा बालेकिल्ला असून आ.सुरेश धस आणि आ.भीमराव धोंडे यावेळी किती मताधिक्य देतात यावर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.२००४ च्या निवडणुकीत भाजपाचे प्रकाश सोळंके यांना १२ हजार ६४४ मतांची आघाडी दिली. विशेष म्हणजे राष्टÑवादीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार हे १९९९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडून आले तेव्हा आष्टीने त्यांना ३४ हजारांचे मताधिक्य दिले होते त्याच गायकवाडांना २००४ मध्ये राष्टÑवादीच्या तिकिटावर उभे असताना १२ हजार मतांनी पिछाडीवर ठेवले. याचाच अर्थ आष्टी विधानसभा मतदार संघ हा उमेदवारापेक्षा, जातीपातीपेक्षा भाजपाला मानतो, असा होतो. २००९ मध्येही आष्टी मतदार संघाने भाजपाच्या गोपीनाथराव मुंडेंना ३९ हजारांचे भरघोस मताधिक्य दिले होते. त्यांच्या विरोधात राष्टÑवादीचे रमेश आडसकर रिंगणात उरले होते.२०१४ मध्ये भाजपाच्या गोपीनाथराव मुंडेंना आष्टीने पुन्हा एकदा जवळपास दहा हजारांचे मताधिक्य दिले. यावेळी राष्टÑवादीकडून स्थानिक उमेदवार आ.सुरेश धस रिंगणात उतरले होते. आ.सुरेश धस हे स्थानिकचे असल्यामुळे भाजपाचे मताधिक्य कमी झाले होते. आता तर आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, रमेश आडसकर आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांची एकत्रित ताकद ही भाजपाच्या उमेदवार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या मागे उभी राहिली असल्याने भाजपाची बाजू मागच्या चार लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक भरभक्कम झाली आहे. दुसरीकडे या चौघांच्या तोडीस तोड असे नेतृत्त्व राष्टÑवादी काँग्रेसकडे नसल्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणा तुलनेत खूपच कमकुवत आहे.युती प्लस पॉर्इंट काय आहेत?आष्टी विधानसभा मतदार संघात आ. भीमराव धोंडे आणि आ.सुरेश धस यांचे नेटवर्क ही भाजपाच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांची ताकद आहे. दोघांसोबत आता क्षीरसागरबंधू आल्यामुळे भाजपा अधिक मजबूत झाला.युती वीक पॉर्इंट काय आहेत?भाजपात असलेले बाळासाहेब आजबे आणि सतीश शिंदे हे आता राष्टÑवादी काँग्रेसमध्ये गेले आहेत. दोघेही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार आहेत. थोडाफार फटका भाजपाला बसू शकतो......आघाडी प्लस पॉर्इंट काय आहेत?शरद पवार यांनी रविवारी आष्टीत जाहीर सभा घेऊन राष्टÑवादीच्या निवडणूक यंत्रणेत जीव ओतण्याचा प्रयत्न केला. या सभेमुळे थोडीफार यंत्रणा मतदारसंघात सक्रीय झाली आहे.आघाडी वीक पॉर्इंट काय आहेत?आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, आ.जयदत्त क्षीरसागर यांचे या मतदार संघात तगडे नेटवर्क आहे. आता क्षीरसागर हे भाजपाच्या उमेदवारासोबत असल्यामुळे भाजपाची ताकद ही दुप्पटीने वाढली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbeed-pcबीडSuresh Dhasसुरेश धसBhimrao Dhondeभीमराव धोंडे