गेवराई : २७ फेब्रुवारी रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जि. प. माध्यमिक शाळा धोंडराई येथे ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत कवी, कथा-कादंबरीकार संतोष विठ्ठल घसिंग यांची मुलाखत घेण्यात आली.
घसिंग यांनी आपला प्रेरणादायी असा संपूर्ण वाचन व लेखन प्रवास दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर मांडला.
यावेळी त्यांची प्रकट मुलाखत धर्मराज करपे यांनी घेतली. विविधांगी प्रश्नांना उत्तरे देताना घसिंग यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे मार्गदर्शन केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी स्वरचित काव्यवाचन केले. अक्षरा भालशंकर, मोनिका साखरे व मोनिका पांढरे या विद्यार्थिनींनी उत्तम कविता सादर केल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी केले.
आभार नितीन माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणेश शहाणे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अरुण खरात व कृषी सहायक परीक्षित करपे उपस्थित होते. यावेळी प्रशालेतील शिक्षक बप्पासाहेब काळे, संजय पांढरे, जालिंदर ठवरे, साहेबराव बरकते, प्रकाश खरात, प्रेम सिडाम, प्रवीण गायकवाड, नितीन ढाकणे उपस्थित होते.