शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
12
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
13
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
14
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
17
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
18
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
19
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
20
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?

वेगवेगळ्या निकषांमुळे संभ्रम, एकसमान धोरण हवे; डीएचओ संघटनेकडून मुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:32 PM

होम क्वारंटाईन व इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनबाबत वेगळे निकष वापरण्यात येत आहेत. त्यामुळे संभ्रम आहे.

ठळक मुद्दे डीएचओंनी चर्चा करून अभ्यासपूर्ण अशा १४ मार्गदर्शक सुचना सुचविल्या आहेतअन्वेषण समितीच्या शिफारशींची प्रतिक्षा

- सोमनाथ खताळबीड : राज्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. याला आळा घालण्यासाठी  जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेने प्रतिबंधात्मक व उपायययोजनांसाठी १४ मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री रजोश टोपे यांना पत्रही दिले आहे. सध्या वेगवेगळे निकष लावल्यामुळे सर्वचजण संभ्रमात आहेत. या सुचनांचा विचार करून याची राज्यभरात अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यात सुचविले आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकारी हे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहेत. सध्या राज्यात सर्वत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यंत्रणेमार्फत योग्य काम करून घेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कोरोनाला प्रतिबंध झाला आहे. परंतु काही ठिकाणी कोरोना वाढतच आहे. याला आळा घालण्यासाठी डीएचओंनी चर्चा करून अभ्यासपूर्ण अशा १४ मार्गदर्शक सुचना सुचविल्या आहेत. होम क्वारंटाईन व इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईनबाबत वेगळे निकष वापरण्यात येत आहेत. त्यामुळे संभ्रम आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईहून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जाते. इतर जिल्ह्यात तसे होत नाही. हा सुद्धा संभ्रम आहे. असे अनेक मुद्दे संघटनेने शोधून यावर सुधारीत मार्गदर्शक सुचना तयार केल्या. यामुळे कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. याचा शासनस्तरावरून विचार करून याची राज्यभर अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी यात सुचविले आहे. डीएचओ यांचा ग्राऊंड लेव्हलवर काम असते. त्यामुळे त्यांना याचा जास्त अुनभव आला आहे. आता शासन यावर काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. 

अन्वेषण समितीच्या शिफारशींची प्रतिक्षाकोरोनामुळे रुग्ण दगावल्यास त्याचे अन्वेषण करण्यासाठी राज्यस्तरावर तजांची समिती तयार केली. कारणे शोधून त्यांनी शिफारशी अपेक्षित होते. परंतु अद्यापही त्यांच्या शिफारशी जिल्ह्यांपर्यंत मिळालेल्या नाहीत. माता मृत्यू अन्वेषण समिती ज्याप्रकारे काम करीत आहे, त्याप्रमाणेच या समितीनेही काम केल्यास फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात ३३ हजार पदे रिक्तमहाराष्ट्रात आरोग्य विभागाची ५६ हजार ६२१ पदे आहेत. पैकी १७ हजार ५ रिक्त आहेत. तर ग्राम विकास विभागाकडील १६ हजार असे जवळपास ३३ हजार पदे रिक्त आहेत. हे सर्व पदे भरणे आवश्यक आहेत. तसेच सर्व संवर्गातील बिंदुनामावली अद्यावत करून रखडलेल्या पदोन्नत्या खास बाब म्हणून नियम शिथील करून त्या कराव्यात, अशी मागणीही संघटनेने केली आहे. 

असे केले तर होईल फायदाकोरोना रुग्णांसाठी सुधारित डिस्जार्ज पॉलिसी तयार करणे, आयसीएमआर व एनएआरआय मार्फत होणारा नॅशनल सेरो सर्वे लवकर पूर्ण करावा यामुळे राज्यात प्रीवेलेन्स बाबत स्पष्टता येईल. होम व इन्स्टीट्यूशनल क्वारंटाईन बाबत एकसमान धोरण हवे. सॅम्पल टेस्टींगबाबत एकसमाने धोरण असावे. विदेश, राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना ज्या जिल्ह्यात येणार आहेत, त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना परवानगीचे अधिकार द्यावेत. आरोग्य विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांबाबत धोरण क्वारंटाईनबाबत धोरण ठरवावे. पीपीई किटची उपलब्धता पुरेशी नाही, हे वास्तव आहे. राज्यस्तरावरून खरेदी करून पुरवठा तात्काळ करावा. केअर सेंटरमध्ये आरोग्य विभागाचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे नॉन मेडिकल सुविधांसाठी पालिकेकडे जबाबदारी द्यावी. आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना हार्ड शिप अलाऊन्स प्रोत्साहन म्हणून द्यावे. १०२ रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात. रिक्त पदांची तात्काळ भरती करावी, अशा उपाययोजना पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना सुचविल्या आहेत. 

एकसमान धोरण ठरवावेमहाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी व त्यांची टिम जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. परंतु काही ठिकाणी निकषांमुळे संभ्रम होत आहे. याबाबत काही बाबी शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. याबाबत मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना एक निवेदन दिले आहे. अनेक मुद्दे यात नमूद केले आहेत. यावर शासनाने विचार करून सर्वत्र अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली आहे. एकसमान धोरण ठरविल्यास कामाची गतीही वाढेल.- डॉ.आर.बी.पवार, अध्यक्ष, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटना महाराष्ट्र

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीडChief Ministerमुख्यमंत्री