शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

शवविच्छेदनगृहाअभावी मृतदेहांची अवहेलना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:00 AM

जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचे दुर्लक्ष : ३६ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळूनही उदासिनता

बीड : जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतदेहांची अवहेलना होत असल्याचे समोर आले आहे. पीएचसीत सुविधा नसल्याने ग्रामीण अथवा उपजिल्हा, जिल्हा रूग्णालयाची वाट धरावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सुविधा व प्राथमिक आरोग्य केंद्रांना इमारत नसल्याने आजारी पडत आहे. ५१ पैकी ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेन गृह बनवावे, यासंदर्भात डिसेंबर २०१८ च्या आरोग्य समिती बैठकीत ठराव घेण्यात आला. त्याप्रमाणे आष्टी तालुक्यातील धामणगाव, धारूर तालुक्यातील मोहखेड व भोगलवाडी, पाटोदा तालुक्यातील अंमळनेर व नायगाव, परळी तालुक्यातील नागापूर व पोहनेर, माजलगाव तालुक्यातील सादोळा व गंगामसला येथे शवविच्छेदन गृह बनविण्याचे निश्चीत झाले. एका गृहासाठी ९ लाख रूपयांची तरतुदही करण्यात आली. जवळपास ३६ लाख रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळूनही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने यावर पुढील कारवाई केलेली नाही. आठ महिने झाले तरी याचे साधे टेंडर काढून काम सुरू करण्यास बांधकाम विभाग पुढे सरसावलेला नाही. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आजही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य रूग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शवविच्छेदन गृह नसल्याने मृतदेहांचीही अवहेलना होत आहे. जवळच्या ग्रामीण, उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयात मृतदेह शवविच्छेनासाठी नेला जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामध्ये पोलीस, नातेवाईकांना वेळ लागण्यासह त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. यावर कारवाई करून कामे सुरू करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.नियम वेगळाच आणि काम वेगळेचनियमानुसार ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह आणला, तेथील डॉक्टरांनीच शवविच्छेदन करणे बंधनकारक आहे. तसे आदेश सहसंचालकांनी सर्व उपसंचालकांनाही दिलेले आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात ग्रामीण, उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर संबंधित पीएचसीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत शवविच्छेन करायला लावतात. हे नियमाने चुक आहे. तर दुसºया बाजूला पीएचसीमध्ये सुविधा नसणे, डॉक्टर मुख्यालयी न राहणे ही कारणेही आहेत.कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ?अनेकदा अपघात, खून, आत्महत्यासारख्या प्रकरणात संवेदनशील परिस्थिती निर्माण होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव आणि डॉक्टरांची अनुपस्थित राहत असल्याने येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झालेला आहे. त्यानंतर पुढील आरोग्य संस्थेत शवविच्छेन केले जाते.दरम्यानच्या काळात यंत्रणेला मोठा त्रास होतो. त्यामुळे शवविच्छेदन गृह तात्काळ बांधणे गरजेचे आहे.

टॅग्स :Beedबीडhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू