शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा; "शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबई एअरपोर्टवर.."
2
ठाकरेसेनेची सत्तारांविरोधात मोठी प्लॅनिंग; थेट भाजपा नेत्याला पक्षात घेणार,२०० गाड्या मुंबईकडे
3
“शरद पवार ४ वेळा CM, केंद्रात-राज्यात एकच सत्ता, तरी राज्याचा विकास केला नाही”: उदयनराजे
4
आप नेते सत्येंद्र जैन यांना अखेर जामीन मंजूर; तब्बल 18 महिन्यानंतर तुरुंगातून बाहेर
5
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
6
Kareena Kapoor : सैफ नव्हे 'या' अभिनेत्यासाठी वेडी झाली होती करीना कपूर; बाथरूममध्ये लावलेले पोस्टर
7
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
8
जालियनवाला बाग हत्याकांडानंतर काय घडलं? अक्षय कुमार-माधवनचा आगामी सिनेमा 'या' घटनेवर आधारीत
9
'वाळवा विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक'; सदाभाऊ खोतांनी उमेदवारीची केली मागणी
10
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
11
सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती
12
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
13
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
14
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
15
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
16
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
17
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
18
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
19
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
20
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा

चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 11:42 AM

वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का?

- सोमनाथ खताळ

बीड : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यावेळी जातीय राजकारण झाले. तसेच मतदानाचा टक्काही वाढला. हाच वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार? हे मंगळवारी समजेलच. परंतु, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना परळी आणि आष्टी मतदारसंघातून, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना बीड आणि गेवराई मतदारसंघातून लीड मिळेल, असा विश्वास आहे. त्यादृष्टीने दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून दावे - प्रतिदावे करत आपलाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या गल्लीपासून शहरापर्यंत केवळ निकालाचीच चर्चा सुरू आहे.

बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजनकडून अशोक हिंगे यांचा समावेश होता. परंतु, खरी लढत ही मुंडे आणि सोनवणे यांच्यातच झाली. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीत जातीचा मुद्दा चर्चेत राहिला. अगदी गावातील कॉर्नर बैठकीपासून ते देशाच्या नेत्यापर्यंतच्या सभांमध्ये जातीचा मुद्दा निघाला होता. तसेच यावेळी मतदानाचा टक्काही पावणे चारने वाढला होता. या सर्व टक्केवारीचा अंदाज आणि जातीय समीकरणे जुळवून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे - प्रतिदावे केले जात आहेत. आपलाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु, कोणाचा दावा खरा ठरणार? हे ४ जून रोजी स्पष्ट हाेईल. सध्या तरी सगळीकडे निकालाचीच चर्चा सुरू आहे.

मुंडेंना कोणते मतदारसंघ तारणार?पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. धनंजय मुंडे सोबत असल्याने पंकजा यांना याच मतदारसंघातून लीड मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच आष्टी मतदारसंघातही भाजपचा मतदार मोठ्या संख्येने आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांना लीड ही आष्टीतून मिळाली होती. हे दोनच मतदारसंघ पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ शकतात. केज, गेवराई, माजलगाव हे त्यानंतर येतील. बीडमध्ये कमी लीड मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

बजरंग सोनवणेंना बीड देणार आधार२०१९च्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांना सर्वांत कमी मते बीड मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी जातीय राजकारण झाल्याने मुस्लीम, मराठा मतदार हे सोनवणेंच्या सोबत असतील. त्यामुळे बीड हे सोनवणेंना आधार देईल. यासोबतच माजलगाव, गेवराईमधूनही सोनवणेंना लीडची अपेक्षा आहे. होमपीच असलेल्या केजमध्ये कोणाला लीड मिळते? याकडेही लक्ष लागले आहे.

५ वाजेनंतर १३ टक्के मतदान१३ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले होते. परंतु, त्यानंतर मात्र उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. त्यामुळे हा टक्का वाढून ७०च्या पुढे गेला. हेच वाढलेले मतदान कोणाला फायद्याचे आणि कोणाला तोट्याचे ठरणार? याचे गणित समर्थकांकडून जुळवली जात आहे. प्रत्येकजण दावा - प्रतिदावा करून आपल्या नेत्यावर विश्वास दाखवत आहे.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारीगेवराई ७१.४३माजलगाव ७१.६१बीड ६६.०९आष्टी ७४.७९केज ७०.३१परळी ७१.३१एकूण ७०.९२

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४beed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Pankaja Mundeपंकजा मुंडेbajrang sonwaneबजरंग सोनवणे