लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेची निवडणूक लढविलेल्या परंतु हिशोब सादर न करणाºया ४६ उमेदवारांना निवडणूक कायद्यानुसार पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आल्याने त्यांच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे.
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणाºया बीड जिल्हा परिषदेच्या ६० गटांसाठी मागील वर्षी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. तर २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली होती.निवडणूक अधिनियमानुसार उमेदवाराने (पराजित अथवा निर्वाचित) निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे विहित नमुन्यात सादर करावा लागतो. निवडणुकीनंतर एक महिन्याच्या कालावधीत शपथपत्रासह गोषवारा सादर करणे बंधनकारक असते. तसे न केल्यास संबंधित उमेदवाराला निवडणूक अधिनियमानुसार अपात्र ठरविण्याची तरतूद आहे.
जिल्हा परिषद निवडणुका झाल्यानंतर विहित वेळेत बहुतांश उमेदवारांनी खर्चाचा तपशील शपथपत्रासह सादर केला. उर्वरित उमेदवारांना स्मरणपत्रे पाठविण्यात आली. मात्र एक वर्ष पूर्ण होत असतानाही खर्चाचा तपशील दाखल करण्यास अनेक उमेदवारांनी कुचराई केली. जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणाºया ५५ उमेदवारांनी अद्यापपर्यंत खर्चाचा गोषवारा शपथपत्रासह सादर केलला नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जानेवारीत पुन्हा नोटीस जारी करण्यात आल्या. यापैकी ४६ उमेदवारांचा गोषवारा प्राप्त झाला. या उमेदवारांनी सादर केलेला खुलासा समर्पक नसल्याने जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख नुसार ४६ उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरित दहा जणांवरही अशीच कारवाई होणार आहे. याबाबत जि.प. प्रशासनालाही कळविण्यात आले आहे.निवडणूक कायद्यानुसार कारवाईफकिरा हातागळे, बळीराम नाडे, यादव सराटे, बाळू साबळे, संतोष हातागळे, राजेंद्र पौळे, विठ्ठल भालशंकर, प्रशांत ससाणे, शोभा लोंढे, सुनीता राठोड (सर्व ता.गेवराई), अभिमान पटाईत, विजयकुमार पटाईत, विकी पोपळे, बाबासाहेब खाडे, सुंदर खाडे, बालाजी वाघमारे, लहू वाघमारे, मनीषा गलांडे, श्रीराम तांदळे, मंगेश देशमुख, सुंदर खाडे (सर्व रा.केज), अशोक दहिफळे, उबेदखान पठाण, रुपेश बेदरे (सर्व ता.पाटोदा), संध्या गव्हाणे, ज्योती थोरवे, छाया खाडे (सर्व ता.आष्टी), नीलेश मोहिते, रेणुका शिंदे, किशोर कसबे, भीमराव कुटे, राजूबाई खरात, बाळासाहेब शिंदे, स.अन्वर अली, अलका हजारे, वैशाली घुमरे, शरद झोडगे, अविनाश मोरे, बापूराव मोरे (सर्व ता.बीड), सुधाकर मिसाळ, अंबादास गोरे, शे.कमालोद्दिन, सोनू बडे (सर्व ता. शिरुर), सुधाकर कांबळे, धनराज धुमाळ, सुप्रिया तरकसे (सर्व ता. धारुर)