लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने बीडसह जिल्ह्यात तीन ठिकाणी दुधाचे नमुने घेतल्याने दूद विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.राज्यात विक्री होणारे दूध कसे आहे, त्याचा दर्जा कसा आहे, दुधामध्ये फॅय किती आहे यासह भेसळ आहे की नाही आदी बाबी तपासण्याच्या अनुषंगाने राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात सर्विलन्स सॅम्पल मोहीम सुरू केली आहे. यासाठी अन्न सुरक्षा मानके विभागाचे अधिकाऱ्यांचे पथक राज्यातील विविध जिल्ह्यात फिरत आहे.बीड शहरात दोन दिवसांपासून हे पथक दुधाचे नमुने घेत होते. शहरातील सम्राट चौक, राजीव गांधी चौक तसेच इतर भागातून स्थानिक व ग्रामीण भागातून आलेल्या विक्रेत्यांकडून दूध खरेदी करुन ते नमुने सील केले. यावेळी काही विक्रेत्यांनी विरोध दर्शविला. अन्न सुरक्षा मानके विभागाचे मुंबई येथील दोन अधिकारी तसेच बीड येथील अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे, एच. आर. मरेवार यांच्या पथकाचा यात समावेश होता.जिल्हाभरात मोहीम, १७ नमुने घेतले४बीड शहरातून ५, बीड ग्रामीणमधून ४, अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून प्रत्येकी ४ असे एकूण १७ नमुने घेण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार हे नमुने घेण्यात आले. या मोहिमेतून कारवाई होत नसते, मात्र दुधाची परीक्षा होते हे निश्चित.
अन्न प्रशासनाने नमुने घेतल्याने दूध विक्रेत्यांमध्ये खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:40 AM