येथील पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक हे नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असतात. रंजीत पवार यांच्या आधार माणुसकीचा व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आजपर्यंत वृक्षारोपण, शालेय साहित्य, सहारा येथे खाऊ वाटपासह विविध उपक्रम राबविण्यात आले. या सामाजिक कामात आणखी भर म्हणून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, शास्त्री चौक, बसस्थानक तसेच शहागड येथील बसस्थानकावर गोरगरीब नागरिक थंडीत कुडकुत होते. हे पोलीस नाईक रंजीत पवार यांनी पाहिले. याची दखल घेत त्यांना मायेची ऊब देण्यासाठी ३० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता थंडीत उघड्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेटचे वाटप पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे, स.पो.नि. संदीप काळे, पोलीस नारायण खटाने, राकेश ठाकूर, सह ग्रुपमधील सदस्य कपिल गोडसे, जगन्नाथ पवार, अण्णासाहेब डोके, प्रतीक राका, अजीत मुळीक, अमोल देशमुख, किरण बेदरे, नवनाथ ठोसर, महादेव काळे, प्रा. महेश चौरे, स्वामी अण्णा, खमितकर इत्यादींच्या सहकार्याने वितरण करण्यात आले. या खाकीतील माणुसकीच्या सामाजिक उपक्रमामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतूक होत आहे.
आधार माणुसकीच्या वतीने गरिबांना ब्लँकेटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:23 AM