बीड : आनंदमार्ग प्रचारक संघ मुंबईअंतर्गत आनंदमार्ग युनिव्हर्सल रिलीफ टीम (एएमयूआरटी) व रेणुका माउली सेवाभावी संस्था बीडच्या संयुक्त विद्यमाने आनंदमार्ग प्रचारक संघाच्या वतीने, शहरातील पंचशीलनगर, अंकुशनगर, खंडेश्वरी परिसरातील शंभर गरजू लाभार्थ्यांना मास्क, किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
मुंबई येथील आनंदमार्ग प्रचारक संघ महाराष्ट्रात ८३ संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असून, सन २०१५ पासून स्वत:च्या अर्थिक सहकार्याने, तसेच नाम फाउंडेशनच्या मदतीने पाणी आडवा, पाणी जिरवा या संकल्पनेतून विविध सामाजिक कार्य करीत आहे. बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे मुख्य संचालक राजू वंजारे, संचालक अभिजीत वैद्य, शालिनी परदेशी यांनी आनंदमार्ग प्रचारक संघाशी संपर्क करून, जिव्हाळा केंद्रातील विविध कार्याची माहिती दिली. याची दखल घेऊन संस्थेचे ॲड.नरेंद्र राजपुरोहित (मुंबई) यांनी मागील काळात बीड येथील गरजू महिलांसाठी शिलाई मशीन देऊन मदत केली होती, तर सध्या कोरोना संकटकाळात शहरातील शंभर गरजू लाभार्थ्यांना दोन किलो तांदूळ, एक किलो गोडेतेल, दोन किलो साखर, चहापत्ती पुडा, मीठ पुडा, दोन किलो गहू आटा असे किराणा सामान योग्य गरजूंना घरपोच केले, तसेच जिव्हाळा बेघर केंद्रातील लाभार्थ्यांना अन्नदान केले.
जल है तो कल है
आनंदमार्ग प्रचारक संघाच्या माध्यमातून बीड शहरापासून जवळच अंथरवनपिंप्री येथील गावकऱ्यांच्या सहकार्यातून नदीचा गाळ काढून रुंदीकरण, खोलीकरण करण्यात आले, तर उमरद जहांगीर या गावातील नदीचा गाळ काढण्याबरोबर नदीचे रुंदीकरण, खोलीकरणाचे काम मागील काही दिवसांपासून संस्थेने हाती घेतले आहे. सरपंच दिलीप आहेर यांचे या कामी योगदान लाभले. बीडच्या ग्रामीण भागात आनंदमार्ग प्रचारक संघाचे ‘जल है तो कल है’ हा संदेश पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे.
===Photopath===
280521\28_2_bed_1_28052021_14.jpg
===Caption===
शंभर गरजू कुटुंबाना किराणाचे वाटप