धारूर : कोरोना लॉकडाऊन असल्याने अनेकांंना रोजगार नाही. यामुळे अनेक गरजू, गरीब आर्थिक अडचणीत आहेत. अनेकांची उपासमार सुरू आहे. यामुळे सामाजिक बांधिलकीतून टेक महिंद्रा फाउंडेशन (पुणे) यांच्या सहकार्याने ग्राम ऊर्जा फाउंडेशनने आतापर्यंत अशा गरजू कुटुंबांना एक हजार धान्य, किराणा किटचे वाटप केले. सदर किटमध्ये तांदूळ, पीठ, मीठ व इतर रोजच्या वापरातील साहित्य यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचा पहिला टप्पा बीड जिल्ह्यातील धारूर, केज, अंबाजोगाई तालुक्यातील ३० गावांमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. अंबाजोगाई शहरातील शिकलकर वस्ती, पारधी वस्ती व इतर झोपडपट्टी वस्त्यांमध्ये सुद्धा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. यासाठी टेक महिंद्रा फाउंडेशनकडून कल्पना दिवाडकर, संदीप पंडित, इम्रान आलमेल यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले. ग्राम ऊर्जा फाउंडेशनच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनीही यासाठी परिश्रम घेतले.
===Photopath===
170521\anil mhajan_img-20210517-wa0081_14.jpg