पालावर राहणाऱ्या कुटुंबातील गरोदर, लेकुरवाळ्या महिलांची कोरोनाकाळात उपासमार होत असताना आणि सरकारने या लोकांची रेशनची सोय न करता वाऱ्यावर सोडत लॉकडाऊन वाढवले. याचा परिणाम या भटक्या लोकांच्या उपासमारीच्या समस्या वाढण्यात झाला. यासाठी निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या प्रमुख सत्यभामा सौंदरमल यांनी अनेक संस्थांच्या कानावर ही बाब घालून मेलद्वारे कळविले. यातून बिरादरी प्रकल्प हेमलकसाचे संचालक अनिकेत आमटे यांनी लागलीच एक टन गव्हाचे पीठ आणि एक टन तांदूळ असे एक टेम्पो रेशन पाठविले. सध्या या रेशनचे वाटप जिल्ह्यातील वेगवेगळ्या पालवस्त्यांवर राहणाऱ्या लोकांबरोबरच एकल महिला, बेवारस, ज्येष्ठ नागरिक, स्तनदा, गरोदर माता यांना सुरू असून, गुरुवारी माजलगाव शहरातील पालांवर याचे वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण डावरे, संस्थेच्या कार्यकर्त्या भारती सौंदरमल आदी उपस्थित होते.
===Photopath===
130521\purusttam karva_img-20210513-wa0025_14.jpg