लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जून महिना संपून देखील बीड जिल्हा आणखी कोरडा असल्याची चित्र आहे. तुरळक झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. तसेच शेती कामासाठी जनावरे घरी घेऊन गेल्यामुळे ६०० चारा छावण्यापैकी १२ चारा छावण्या सद्य:स्थितीमध्ये सुरु असून, भर पावसाळ्यात ग्रामीण व शहरी भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मोठा पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा अजूनही आहे.जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकीर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल मागील वर्षी झाले होते. या दुष्काळाच्या काळाता पशुधन वाचवण्यासाठी ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, तर ९०० टँकद्वरे पाणी पुरवठा केला जात होता.जून महिन्यात कमी प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी व कापूस लागवड केली आहे. परंतु आता मोठ्या पावसाची आवश्यकता आहे, तरच पीक तग धरेल अन्यथा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणी करावी लागणार असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांमधून व्यक्त केल्या जात आहेत.६०३ चारा छावण्यापैकी जिल्ह्यात १२ चारा छावण्या अजूनही कार्यरत त्यापैकी गेवराई तालुक्यात ६ बीड तालुक्यात १ आष्टी तालुक्यात ३ तर वडवणी तालुक्यात १ चारा छावण्या कार्यरत आहेत. असे चित्र जरी असले तर देखील अजूनही अनेक ठिकाणी चाºयाची उपलब्धता झालेली नाही.शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या चा-यावर सध्या जनावरांची गुजरान सुरु आहे. तर संपूर्ण तालुक्यात ९०० च्या जवळपास टँकर सुरु होते. मात्र, दुष्काळी मुदत संपल्यामुळे अनेक ठिकाणी गरज असताना देखील टँकर बंद करावे लागले आहेत.यासाठी जिल्हा प्रशासनाकडून टँकरच्या मदतवाढीचे प्रस्व मागवले आहेत. त्यानूसार आवश्यकतेनूसार टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.टँकर मुदतवाढीचे मागवले प्रस्तावज्या तालुक्यात अजून ही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची आवश्यकता आहे त्या तालुक्यांनी मुदतवाढीचे प्रस्ताव पाठवणे सुरु केले आहे.यामध्ये आष्टी व अंबाजोगाई तालुक्याचे प्रस्ताव आले असून त्या ठिकाणी २०० टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरु आहे,मंगळवारपर्यंत इतर तालुक्याचे प्रस्ताव येतील त्यानंतर चांगला पाऊस पडेपर्यंत जवळपास ४०० पेक्षा अधिक टँकरची आवश्यकता भासेल असे मत संबंधीत यंत्रणेच्या अधिका-यांकडून वर्तवण्यात येत आहे.
बीड जिल्ह्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:54 AM