लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सध्या आरोग्य विभागाच्या वतीने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात मोतीबिंंदू शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे. तब्बल पावणेचार हजार शस्त्रक्रिया झाल्याची नोंद जिल्हा रुग्णालयात आहे. महाराष्ट्राच्या अभियानाला बीडमध्ये अगोदरच सकारात्मक प्रतिसाद असल्याचे यावरुन स्पष्ट होते.राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समिती अंतर्गत जिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जातात. रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या सुसज्ज इमारतीत डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया केल्या जातात. गतवर्षी जिल्ह्याला ३४५२ शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. हे उद्दिष्ट पूर्ण करुन तब्बल पावणेचार हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.यावर्षीचे उद्दिष्ट अद्याप आले नसले तरी केवळ तीन महिन्यात १५४९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. महाराष्ट्राच्या अभियानात सहभाग नोंदविण्याबरोबरच डोळ्याच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी कक्ष प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या शस्त्रक्रियांसाठी डॉ. अशोक थोरात, आर.एम.ओ. डॉ. आय. व्ही. शिंदे, सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राधेश्याम जाजू, डॉ. सी. एस. वाघ, डॉ. एस. एस. राठोड हे परिश्रम घेत आहेत.मोतीबिंदू होण्याची कारणे४बरीच वर्षे कामासाठी किंवा काही नेहेमीच्या प्रसंगी प्रखर प्रकाशाला सामोरे गेल्यास.४मधुमेह ४दम्यासाठी स्टिरॉईड घेणे.४धुम्रपान किंवा दारू पिणे.४जन्मत:च मोतीबिंदू असल्यास.४ग्लॉकोमासारखी समस्या असल्यास.मोतीबिंदूची लक्षणे४डोळ्यांच्या बाहुल्या धुरकट किंवा सफेद होणे. डोळ्यांच्या मध्यभागी असणारा काळा गोल म्हणजे बाहुली. ४रंग फिक्कट दिसतात. ४सर्व काही अस्पट दिसते. ४प्रकाशामुळे डोळे दुखतात व प्रकाश अतिप्रखर वाटतो. ४रात्रीच्या वेळी प्रकाशाभोवती वलये दिसतात. ४एका डोळ्याने दुहेरी दिसणे. ४रात्रीच्या वेळी स्पष्ट न दिसणे. ४चष्म्याची किंवा दृष्टीची औषधपत्रे सतत बदलणे.
‘मोतीबिंदूमुक्त बीड’साठी जिल्हा रुग्णालयाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 11:53 PM
सध्या आरोग्य विभागाच्या वतीने मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आढावा घेतला असता बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात मोतीबिंंदू शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती झालेली आहे.
ठळक मुद्देउद्दिष्टपूर्ती : वर्षभरात पावणेचार हजार शस्त्रक्रिया; जिल्हा रुग्णालयात तपासणी, शस्त्रक्रियेसाठी स्वतंत्र विभाग