बीड : तालुक्यातील तांदळवाडी हवेली येथे १९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाला डीजे लावून मिरवणूक काढल्याचे समोर आले. याप्रकरणी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह डीजे मालक व चालकावर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामीण ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक शांतीलाल गोरे यांनी याबाबत फिर्याद नोेंदवली. त्यानुसार तांदळवाडी हवेली येथे महेश तुपे, राम यमगर व संदीप लोंडे या तिघांनी विनापरवाना गणेशमूर्तीची स्थापना केली. विसर्जनादिवशी डीजे कृष्णा घाडगे (रा. तळेगाव, ता. बीड) यास बोलावून घेत डीजे वाजवला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या कोरोना प्रतिबंधक आदेशांचे उल्लंघन केल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.