सोमनाथ खताळ ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पोटात कळा यायला लागताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) गर्भवती जाते. येथील डॉक्टर तपासणी करुन प्रकृती गंभीर असल्याचे कारण पुढे करीत पुढच्या रुग्णालयात त्यास रेफर केले जात असल्याचे समोर आले आहे. मागील वर्षभरात ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये केवळ २८०८ महिलांची प्रसूती झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पीएचसीत मातांना कमी अन् प्रसूती करण्यास डॉक्टरांनाच ‘कळा’ (त्रास) येत असल्याचे बोलले जात आहे.बीड जिल्ह्यात एका जिल्हा रुग्णालयासह एक स्त्री रुग्णालय, ३ उप जिल्हा रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालय, तसेच ५० प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंतच्या प्रसूतीचा आढावा घेतला असता ५० आरोग्य उपकेंद्रांमध्ये २८०८ प्रसुती झाल्याचे समोर आले. दुसऱ्या बाजूला जिल्हा रुग्णालयांतर्गत असणाºया नेकनूरचे स्त्री रुग्णालय, गेवराई, केज व परळी येथील उप जिल्हा रुग्णालय तसेच ९ ग्रामीण रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालयात तब्बल १९ हजार १२१ प्रसूतींची नोंद आहे. ४ हजार ७०८ महिलांचे सिझेरियन झाले आहे.दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रात सिझरची सुविधा नाही. मात्र, सामान्य प्रसूतीसाठी सुविधा आहेत. परंतु येथील डॉक्टर काहीतरी कारण काढून पुढच्या रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला देऊन हात झटकत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच प्रसूतीचा आकडा खूपच कमी आहे.32 पीएचसीला 0 गुण४केंद्राच्या ठिकाणी प्रसूती करणाऱ्यांना डीएचओंनी ५ गुण दिले आहेत.४पैकी ३२ केंद्रांना ० गुण दिले आहेत. यावरुन आरोग्य केंद्रांचा कारभार कसा चालतो याचा प्रत्यय येत आहे.४घाटनांदूर, पात्रूड, जातेगाव, चौसाळा या केंद्रांनी पैकीच्या पैकी गुणपटकावले आहेत.घाटनांदूर अव्वल, तर वाहलीचा निच्चांक४जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकृष्ण पवार यांनी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा आढावा घेऊन त्यांना गुण दिले आहेत.४त्यात घाटनांदूरच्या पीएचसीने ९२ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. पाटोदा तालुक्यातील वाहलीचे पीएचसी ४८ गुण मिळवत निच्चांक स्थानी राहिले.सर्व डॉक्टर, कर्मचाºयांना रुग्णसेवा तात्काळ व सक्षम देण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. प्रत्येक रुग्णाकडे विशेष गांभीर्याने लक्ष दिले जाते. कामचुकारपणा करणाºयांना कदापीही पाठीशी घातले जाणार नाही.- डॉ. अशोक थोरात,जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
प्रसूतीसाठी मातांना नव्हे, डॉक्टरांना ‘कळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:54 PM
पोटात कळा यायला लागताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (पीएचसी) गर्भवती जाते. येथील डॉक्टर तपासणी करुन प्रकृती गंभीर असल्याचे कारण पुढे करीत पुढच्या रुग्णालयात त्यास रेफर केले जात असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देरुग्ण रेफर करुन कामचुकारपणा : बीड जिल्ह्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वर्षभरात केवळ २८०८ महिलांची प्रसूती