गेवराई : उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन कमतरतेमुळे मंगळवारी डाॅक्टरांची धावपळ झाली होती. तसेच काही नागरिकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाहणी करून आमदार, तहसीलदार, पोलीस अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारीसह अनेकांच्या उपस्थितीत तब्बल दोन तास आढावा बैठक घेतली. ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने त्याचा वापर योग्य पद्धतीने करा, तसेच रुग्णाला चांगली सेवा उपलब्ध करा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने शहरातील व गढी येथील कोविड केअर सेंटर फुल झाले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये ६० रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय आहे. मंगळवारी सकाळी ऑक्सिजनची कमतरता जाणवल्याने मोठी धावपळ झाली होती. वेळेला ऑक्सिजन मिळाला नसता तर विपरीत घडले असते. याबाबत काही नागरिकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना माहिती दिली होती. याची गंभीर दखल घेत आयुक्त केंद्रेकर यांनी बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली.
यावेळी आ. लक्ष्मण पवार, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक आर. राजा, तहसीलदार सचिन खाडे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे, गटविकास अधिकारी अनिरुद्र सानप, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संजय कदम, डाॅ. राजेश शिंदे आदी उपस्थित होते.
सध्या ऑक्सिजनचा तुतवडा असल्याने ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज आहे. त्यांनाच ऑक्सिजन द्या, डिरो सिंलिंडर, बायपॅप मशीन उपलब्ध करून द्या अशी सूचना त्यांनी सीईओ अजित कुंभार यांना केली. तसेच येथील डाॅक्टरांनी वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करून रुग्णाला योग्य ते उपचार द्यावेत, यात हालगर्जीपणा करू नका, तसेच कोणत्या कोविड सेंटरमध्ये किती रुग्ण आहेत याची माहिती आयुक्त सुनील केंद्रे यांनी बैठकीत घेतली. बैठक संपल्यानंतर येथील कोविड सेंटरमधील रुग्णांची विचारपूस केली. यावेळी कोरोना सेवा समितीच्या वतीने रुग्णालयात लागणाऱ्या विविध साहित्य व वस्तूंची मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
===Photopath===
120521\20210512_130813_14.jpg~120521\20210512_130020_14.jpg