बीड : टायफाईड हा एक संसर्गजन्य आजार आहे. पावसाळ्यात जास्त प्रमाणात याचे रुग्ण आढळतात. दूषित अन्न आणि पाणी प्यायल्याने हा आजार होत आहे. पाणीपुरी, भेळ, रगडा या ठिकाणी अस्वच्छ पाणी वापरल्याने हा आजार पसरण्याची भीती आहे.
...
आजाराची लक्षणे
n ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, मळमळणे, थकवा येणे, शौचास न होणे, डायरिया, भूक न लागणे, पाेटदुखी ही मुख्य लक्षणे आहेत.
n तसेच काही रुग्णांमध्ये या लक्षणांसोबतच सांधेदुखी आणि हात-पाय दुखतात.
...
...ही घ्या काळजी
वारंवार हात धुणे, स्वच्छ पाणी व अन्न सेवन करणे. टायफाईडची लस घेणे.
शौच व शौचालयाचा वापर करणे, यामुळे टायफॉईडच्या प्रसार थांबवू शकतो.
....
जिल्हा रुग्णालयातील टायफाईडचे रूग्ण
मे - ३
जून - २
जुलै - २