बीड : कमी खर्चात दर्जेदार शिक्षण व रोजगाराची हमी यामुळे विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निक शिक्षणाकडे कल वाढत आहे. तीन वर्षांत डिप्लोमा केल्यानंतर शासकीय अथवा खासगी कंपन्यांत रोजगार संधीमुळे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंगला विद्यार्थ्यांची पसंती आहे. बीड जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ करिता प्रथम वर्ष पोस्ट दहावीनंतर डिप्लोमा इन इंजिनियरिंग प्रवेश प्रक्रिया अर्ज नोंदणीच्या विविध प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पार पडल्या. पहिल्या फेरीचे जागावाटप १८ सप्टेंबरपासून सुरू झाले. २३ सप्टेंबरला संबंधित संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. येत्या २४ सप्टेंबर रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ऑनलाईन जाहीर होणार आहे. २५ ते २८ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठीचा ऑनलाईन विकल्प अर्ज भरून निश्चित केल्यानंतर दुसऱ्या फेरीचे जागावाटप ३० सप्टेंबर रोजी होईल. १ ते ६ ऑक्टोबरपर्यंत संबंधित संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश निश्चित करता येणार आहे. रिक्त जागा असल्यास संस्थास्तरावरील प्रवेश फेरी ७ ते १३ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षे शिक्षण व रोजगार क्षेत्रासाठी अडचणींचे गेले. परंतु, कोरोनाची लाट ओसरत चालल्यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पालकांची इच्छाशक्ती दृढ झालेली आहे. बाहेरगावी मुलांना शिक्षणासाठी पाठवायचे की नाही, अशी पालकांच्या मनातील शंका दूर होत चालली आहे.
१) जिल्ह्यातील प्रवेश क्षमता - २४७५
एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये - १०
एकूण प्रवेश क्षमता - २४७५
प्रवेश अर्ज - प्रवेश अर्ज नोंदणी - २६१५
प्रवेश अर्ज निश्चिती - १९३४
शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालये - ०१
शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - ३००
खासगी महाविद्यालये - ०९
खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - २१७५
२) संगणक, इलेक्ट्रिकलकडे ओढा (बॉक्स)
सध्या उद्योग क्षेत्रात मागणीमुळे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनियरिंग अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आहे. तीन वर्षांचा अभ्यासकम पूर्ण केल्यानंतर रोजगाराची संधी असल्याने विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रथम पसंती दर्शवितात. सिव्हिल इंजिनियरिंगकडेही विद्यार्थी इच्छुक आहेत.
३) ...म्हणून पॉलिटेक्निकला पसंदी (दोन विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया)
माझे बारावीचे शिक्षण झाले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे. शासकीय किंवा खासगी क्षेत्रात संधी आहे. कंत्राटासाठी टेंडर परवाना मिळणे सुलभ होईल. इतर अभ्यासक्रमापेक्षा इलेक्ट्रिक इंजिनियरिंगमध्ये स्कोप आहे.
- महादेव श्रीमंत नागरगोजे, विद्यार्थी, घाटनांदूर.
--------------
माझे दहावीचे शिक्षण पूर्ण झाले. सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेण्याचे माझ्या मनात होते. त्यामुळे माझा प्रवेश निश्चित केला आहे. या शिक्षणानंतर कंपन्यांमध्ये लवकर जॉब मिळू शकतो. नाही तर स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल.
- आकाश राजेंद्र संगम, संगम जळगाव, ता. गेवराई, जि. बीड.
४) दोन पॉलिटेक्निक कॉलेज प्राचार्यांची प्रतिक्रिया
या वर्षी बीड जिल्ह्यात पॉलिटेक्निकसाठी चांगला प्रतिसाद आहे. मराठवाड्यात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे पॉलिटेक्निक तसेच तंत्रशिक्षणाला चांगले दिवस आले आहेत, दहावीनंतर फक्त तीन वर्षांमध्येच पॉलिटेक्निक झाल्यावर लगेच शासकीय सेवेत तथा खासगी नामांकित कंपनीमध्ये नोकरीची संधी प्राप्त होते.
- राहुल खडके,
प्राचार्य, आदित्य पॉलिटेक्निक, बीड.
-----------
पॉलिटेक्निक शिक्षणातून रोजगाराच्या संधी आहेत. स्वतः उद्योग व्यवसाय उभारू शकतात. कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होते. कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे स्वयंरोजगार निर्मिती करता येते. स्वत: उद्योग, व्यवसाय करू शकतात. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जागांमध्ये १५ टक्के वाढ होऊ शकते.
- डॉ. मोहन लोहकरे, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, बीड.
--------------