शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
2
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
3
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
4
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
5
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
6
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
7
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
8
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
10
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
11
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
12
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
13
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
14
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
15
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
17
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
18
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली
19
'कासव'गतीनं नऊ हजारी पल्ला गाठणारा भारतीय फलंदाज ठरला किंग कोहली
20
"भाजप तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करतंय", PCS परिक्षेवरून प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

भर दुपारी ढोसली दारू अन् सर्जनची सटकली; सहकाऱ्यांना शिवीगाळ, बीडमधील प्रकार

By सोमनाथ खताळ | Published: February 06, 2023 8:44 PM

धाब्यावर बसून दारू पितानाचा कथीत व्हिडीओ व्हायरल

बीड : जिल्हा रूग्णालयातील एका वरिष्ठ सर्जनने भर दुपारी दारू ढोसली. त्यानंतर सहकारी डॉक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक कथीत व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली असल्याने संबंधित डॉक्टरला नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.

येथील जिल्हा रूग्णालयात उच्च पदावर एक सर्जन कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया न केल्याने आणि मागील आठवड्यात एका दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या रूग्णाला गरज नसताना रेफर केल्याने ते वादात सापडले होते. या प्रकरणात त्यांना नोटीसही बजावली आहे. याचा खुलासा देण्याआधीच या सर्जनचा आणखी एक करनामा समोर आला आहे. बार्शी रोडवरील एका बिअर बारमध्ये बसून दिवसभर दारू ढोसली. त्यानंतर फोन करून सहकारी डॉक्टरांना शिवीगाळ केली. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिव्यांची लाखोली वाहिली. सहकारी डॉक्टरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच घरी जाण्याचा सल्ला दिला, परंतू त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, धाब्यार बसून दारू पितानाचा एक कथीत व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याची गंभीर दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी घेतली असून संबंधित डॉक्टरला नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराने मात्र, आरोग्याची प्रतिमा मलीन झाली असून सोमवारी दिवसभर आरोग्य विभागात याची चर्चा सुरू होती. 

डॉक्टर्स ग्रुपवरून पेटला वादजिल्हा रूग्णालयातील शासकीय डॉक्टरांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. याच ग्रुपवर संबंधित सर्जनने मेसेज पाठविले. यात अनेकांचे नाव होते. येथे कोणी उत्तर न दिल्याने या सर्जनने फोन करून शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. याची अद्याप तरी पोलिसांत नोंद झालेली नाही. तसेच सर्जनला याबाबत विचारले असता मी माफी मागितली असून अशा चुका होतच असतात, असे सांगून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.

सरकारी नोकराने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे चुक आहे. याचा एक कथीत व्हिडीओ मला मिळाला आहे. सहकाऱ्यांसह वरिष्ठांना शिवीगाळ केल्याचेही समजले आहे. ही बाब आरोग्याची प्रतिमा मलीन करणारी आहे. याबाबत संबंधिताला नोटीस बजावणार असून शिस्तभंगासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार आहे. डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :Beedबीड