शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

माजलगाव धरणात ३४ तासानंतर डॉक्टरांचा मृतदेह सापडला; शोध घेणाऱ्या NDRF जवानाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 6:58 PM

बचाव पथके व स्थानिक मच्छीमार तरुणांच्या शोधमोहीमेस यश न आल्याने आज कोल्हापूर येथून 11 जणांच्या एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले. 

माजलगाव : येथील माजलगाव धरणात रविवारी बुडालेल्या डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 34 तासानंतर आज सायंकाळी 5 वाजता पाण्यातून काढण्यात बचाव पथकांना यश मिळाले. दरम्यान, या शोधकार्यात एनडीआरएफच्या एका जवानाचा बुडून मृत्यू झाला. 

माजलगाव येथील डॉ.दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे रविवारी माजलगाव धरणात पोहायला गेले असताना  परत येत आसतांना त्यांना दम लागुन त्रास होऊन त्यांचा बुडुन मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा मृतदेह सापडला नसल्याने  बीड, परळी व माजलगाव कारखान्याच्या बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. बचाव पथके व स्थानिक मच्छीमार तरुणांच्या शोधमोहीमेस यश न आल्याने आज कोल्हापूर येथून 11 जणांच्या एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले. 

दरम्यान, एनडीआरएफ जवानांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन जवान पाण्यात उतरले. खाली शोध घेत असताना मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात पाय अडकून दोन जवान फसले. त्यातील शुभम काटकर याला बाहेर काढण्यात यश आले तर राजशेखर मोरे यास वाचवत असतांना त्याचे ऑक्सिजन सिलेंडर निसटल्याने तो पाण्यात बुडाला. 

जवळपास एक तास झाला तरी तो बाहेर आला नसल्याने या घटनेची तहसीलदार वर्षा मनाळे, विभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना माहिती दिल्यानंतर स्वतः शर्मा हे घटनास्थळी आले. जिल्हाधिकारी शर्मांनी बोटीत बसून धरणात बचावकार्याची माहिती घेतली. अखेर दुपारी दिडच्या सुमारास मच्छीमारांच्या लावलेल्या गळास मोरे यांचा देह लागला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर ही बचाव पथक व मच्छीमारांच्या टीमने शोध कार्य सुरूच ठेवले होते. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास यश मिळाले.

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू