शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

'लाखो रूपये वेतन घेणारे डॉक्टर पुन्हा गायब'; बीड जिल्हा शल्यचिकित्सकांचा वचक दिसेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 18:44 IST

Beed Civil Hospital News : डॉक्टर सरकारी रूग्णालय वाऱ्यावर सोडून स्वता:च्या खाजगी रूग्णालयात ठाण मांडतात.

ठळक मुद्देदुपारी सर्वात महत्वाचा समजला जाणारा मानसोपचार विभाग वाऱ्यावर होता. मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले यांची बुधवारी ड्यूटी होती. परंतू ते गायब होते.

- सोमनाथ खताळ

बीड : जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सुरेश साबळे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर नॉन कोवीड रूग्णांना उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती. सुरूवातीला काहीसा फरकही पडला. परंतू आता पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसते. मानसोपचार विभागातील डॉ.सुदाम मोगले हे रूग्णालयात फिरकत नसल्याचे बुधवारी दुपारी दिसले. त्यामुळे आलेल्या रूग्णांची चिडचिड कमी होण्याऐवजी जास्तच वाढली. कामचुकारपणा पुन्हा सुरू झाल्याने डॉ.साबळेंचा दबाव नसल्याचे सिद्ध होत आहे.

जिल्हा रूग्णालयात बाह्य रूग्ण तपासणीसाठी वेगवेगळे विभाग आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात नॉन कोवीड रूग्णांची तपासणी केली जाते. प्रत्येक विभागात लाखो रूपये वेतन असलेले डॉक्टर नियूक्त केलेले आहेत. परंतू हे डॉक्टर सरकारी रूग्णालय वाऱ्यावर सोडून स्वता:च्या खाजगी रूग्णालयात ठाण मांडतात. हे वारंवार समोर आल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक अथवा इतर अधिकाऱ्यांकडून कसलीच तपासणी केली जात नाही. यावरून या सर्वांची 'अर्थपूर्ण' साखळी असल्याचा आरोप केला जात आहे.

दरम्यान, बुधवारी दुपारी सर्वात महत्वाचा समजला जाणारा मानसोपचार विभाग वाऱ्यावर होता. केवळ तांदळे नामक कर्मचारी या विभागात होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले यांची बुधवारी ड्यूटी होती. परंतू ते गायब होते. तसेच इतर कर्मचारीही उपस्थित नव्हते. अशा कामचुकारांमुळेच सामान्य लोक सरकारी दवाखान्याची पायरी चढत नाहीत. याचा फायदा याच लोकांकडून खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून घेतला जात आहे. यात त्रास मात्र, सामान्यांना होत आहे. त्यामुळे अशा कामचुकारांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आता पुन्हा नोटीसांचा पाहुणचारतक्रार केली तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे व डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडून या कामचुकारांना केवळ नोटीस बजावली जाते. त्यांच्याकडून खुलासा आल्यावर तो मान्य करून काहीच कारवाई केली जात नाही. ही बाब आता सर्वांसाठी नवीन नाही. त्यातच डॉ.मोगले हे वरिष्ठ असल्याने सर्वच जण त्यांना आदर देतात. याचाच गैरफायदा ते घेतात. याचा फटका सामान्यांना बसतो.

चमकोगिरी नको, रिझल्ट हवाडॉ.साबळे यांनी सुरूवातील वारंवार राऊंड घेऊन सर्व डॉक्टर ओपीडीत बसतील असा दावा केला होता. परंतू वारंवार डॉक्टर गायब होत असल्याने त्यांचा दबाव नसल्याचे दिसते. त्यांच्याकडून राऊंड घेऊन कारवाया करण्याच्या धमक्या देऊन चमकोगिरी केली जात आहे. प्रत्यक्षात काहीच फरक पडत नाही. सामान्यांना रिझल्ट हवा असल्याची चर्चा आहे.

काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञकधी मी तर कधी डॉ.मुजाहेद ओपीडी काढतात. माझ्या मागे इतरही कामे असतात, असे डॉ.सुदाम मोगले म्हणाले. तर डॉ.मुजाहेद म्हणाले मी अपंगाच्या बोर्डात आहे. ओपीडीची सर्व जबाबदारी डॉ.मोगलेंवर आहे.

नॉन कोवीड रूग्णांना सेवा देण्याचे पूर्ण आदेश दिलेले आहेत. डॉक्टर गैरहजर असतील तर तात्काळ सुचना करून कारवाई केली जाईल.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

डॉ.माेगले कसलीही कल्पना न देता गैरहजर आहेत. आता फोन केल्यावर आजारी असल्याचे कारण सांगितले. याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.- डॉ.राम देशपांडे, स्थलांतरीत जिल्हा रूग्णालय बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडBeedबीड