बीड : जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यातच १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचे घोषित केले. परंतू पहिल्याच दिवशी नियोजन ढेपाळल होते. त्यामुळे केंद्रावर जावूनही लस न मिळाल्याने लाभार्थ्यांचा हिरमोड झाला. शिवाय तरूणांसह ज्येष्ठांनाही रिकामा हेलपाटा मारावा लागला. आजही जिल्ह्यात लसीचा तुटवडा असून मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ‘लस देता का लस’ अशी ओरड लाभार्थ्यांमधून होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यं २ लाख ३१ हजार लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. यातील १ लाख ८८ हजार ३४६ लोकांनी पहिला डोस घेतला असून ४२ हजार ६७० लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकीकडे लोकांचा लसीबद्दलचा विश्वास वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यातून मागणीही होत आहे. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य विभागाकडून लस पुरेशा प्रमाणात पुरविली जात नाही. राज्यात सर्वत्रच लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे थोडीफार आलेले डोस घेण्यासाठी नागरिक केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागासह शासनाने लसीकरण पूर्ण करण्यासाठी डोस वाढविण्याची मागणी होत आहे. १८ वर्षांवरील तरूणांकडूनही लसीला पसंदी दिली जात आहे.
पहिल्याच दिवशी नियोजन ढेपाळले
गर्दीमुळे आले पोलीस
१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी संख्या १४ लाखाच्या पुढे आहे. परंतू डोस अपुरे असल्याने काही ठिकाणी प्रचंड गर्दी जमली होती. ती पांगविण्यासाठी पोलिसांनाही पाचारण केले होते.
रिकाम्या हाताने परत
नोंदणी करूनही काही लाेकांना केवळ ऑनलाईन अपॉईंटमेंटची माहिती नसल्याने लस न धेताच परतावे लागले. जिल्हाभरात हजारो लाभार्थी लस नसल्याने रिकाम्या हाताने परतले होते.
नोडल ऑफिसरने घेतला लसीकरणाचा आढावा
आलेली लस योग्य पद्धतीने लाभार्थ्यांना द्यावी, तसेच गर्दी होणार नाही, याचे नियोजन करण्याबाबत नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम यांनी रविवारी वैद्यकीय अधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. डॉ.एल.आर.तांदळे सोबत होते.
लसीचा प्रचंड तुटवडा आहे. १८ ते ४५ वयोगटातील २१८ लाभार्थ्यांनी पहिल्या दिवशी लस दिली. परळी, अंबाजोगाईने लसच नेली नाही. तर काही ठिकाणी ॲप व इतर तांत्रीक अडचणी आल्या. आता लस अपुरी असून लाभार्थ्यांची गर्दी पाहता प्रत्येक केंद्रावर नियोजन करण्याबाबत रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली आहे. यात त्यांना गर्दी होणार नाही, नोंदणीशिवाय कोणालाही लस देण्यात येऊ नये आदी महत्वाच्या सुचना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही थोडे सहकार्य करावे.
डॉ.संजय कदम नोडल ऑफिसर
===Photopath===
020521\02_2_bed_26_02052021_14.jpeg
===Caption===
लसीकरणाबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्ही.सी.द्वारे सुचना करताना नोडल ऑफिसर डॉ.संजय कदम. सोबत डॉ.एल.आर. तांदळे दिसत आहेत.