तालखेडला दिशा देणारे जयप्रकाश मुंदडा
गावचे भूमिपुत्र जयप्रकाश मुंदडा यांना १९७१ ते ७४ या कालावधीत शिक्षक म्हणून नवी पिढी घडविण्यासाठी सेवा दिली. परंतु कुटुंब मोठे आणि उत्पन्न पाहता एकट्याने नोकरी करून जमणार नाही या इच्छेतून भावांना सोबत घेत व्यापार क्षेत्रात पाऊल ठेवले. परंतु शाळा आणि विद्यार्थी यांच्यापासून ते दूर गेले नाहीत. १९८० पासून ५० गरजू शाळकरी मुलांसाठी गणवेश, फी व इतर शैक्षणिक मदत सुरू केली. मदतीच्या या कार्याची माहिती घेत मुंदडा यांची तळमळ लक्षात घेऊन परभणी येथे साने गुरूजी व्याख्यानमालेच्या आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. १९९७ मध्ये एक लाख रुपये देणगी देत आई चंपाबाई मिठूलाल मुंदडा यांच्या नावाने माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयात बालवाडीचा श्रीगणेशा केला. मुंदडा यांचे दातृत्व इथेच थांबलेले नाही. मागील २० वर्षांपासून दर महिन्याला ३५ ते ४० निराधारांना प्रत्येकी सहा किलो धान्य वाटपाचा मानवतावादी उपक्रम आजतागायत सुरू आहे. दरवर्षी ३० नोव्हेंबरला या निराधारांना वस्त्रदान करीत सामाजिक पातळीवर आधार देतात.
180921\18bed_9_18092021_14.jpg