बीड : जिल्ह्यात सध्या अनेक गावांसह शहरातील काही भागांत दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी आहेत. आपण पाणी पिताना काळजी घेणे आवश्यक आहे. दूषित पाणी पिल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळते, यात मोठा त्रास होतो. त्यामुळे शुद्ध अथवा उकळून पाणी पिण्यावर अधिक भर द्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होतात. हे अनेकांना माहीत आहे. तरीही, लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या दूषित पाण्यामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण भागांतील सरकारी आरोग्य संस्थेत रुग्णांची गर्दी होत आहे. त्यांच्यावर उपचार केले जात असले, तरी नागरिकांनीच पाणी पिताना काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
--
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
दूषित पाणी पिल्याने टायफाॅइड, कॉलरा, डायरिया, डिसेंट्री यासह पोटाचे विविध आजार होण्याची दाट शक्यता आहे.
--
ही आहेत लक्षणे
संडास पातळ होणे, पोट दुखणे, उलटी, ताप, मळमळ, अंगदुखी, थकवा येणे, अशी लक्षणे दूषित पाणी पिल्यावर होतात.
--
पाणी उकळून प्यायलेले बरे
भांडे, पातेल्यात स्वच्छ दिसणारे पाणीही दूषित असू शकते. त्यामुळे पाणी पिताना उकळून पिलेले कधीही लाभदायक ठरते. यामुळे पाण्यातील विषाणू नष्ट होतात.
--
दूषित पाण्यामुळे पोटासह इतरही विविध आजार होतात. पाणी उकळून पिल्यास लाभ होतो. तसेच थोडीही लक्षणे जाणवली की, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अंगावर दुखणे काढणे अंगलट येऊ शकते. पाणी पिताना काळजी घ्यावी.
डॉ. महादेव चिंचाळे, वैद्यकीय अधीक्षक, गेवराई
080921\08_2_bed_1_08092021_14.jpeg
डॉ.महादेव चिंचाळे