बीड : परिस्थिती गंभीर बनत असून खाटांअभावी रुग्णांना जमिनीवर, बाकड्यावर बसून उपचार घ्यावे लागत आहेत. असे असले तरी उपचार सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये. जागा अपुरी पडत असली तरी उपचारात कमी पडणार नाहीत, यासाठी यंत्रणा सक्षमपणे लढा देत आहेत. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक आदी कर्मचारी यासाठी धावपळ करीत असल्याचे शुक्रवारी दिसले.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात कोरोनाची स्थिती भयंकर बनत आहे. रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने खाटा आणि ऑक्सिजन अपुरे पडत आहेत. मिळेत तिथे बसून आणि आहे त्या स्थितीत रुग्णांवर उपचार करण्याची वेळ सध्या आली आहे. जिल्हा रुग्णालयात तर खाटा अपुऱ्या पडत असल्याने रुग्णांना बाकड्यावर, जमिनीवर झोपवून उपचार करावे लागत आहेत. जागा अपुरी आहे. खाटाही अपुऱ्या असल्या तरी उपचार मिळताहेत, यात लोक समाधानी आहेत. शुक्रवारी फिवर क्लिनिकमध्ये वऱ्हांड्यातच एका वृद्धाला जमिनीवर झोपवून ऑक्सिजन लावले होते तर बाजूच्या खोलीत एका महिलेला बाकड्यावर बसवून ऑक्सिजन लावले होते. येथील डॉक्टर, कर्मचारी सर्वतोपरी धावपळ करून उपचार करत होते.
दरम्यान, नातेवाइकांनीही सध्या आरोग्यकर्मीना सहकार्य करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे. जागा आणि खाटांसाठी वाद न घालता उपचार चांगले कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करावेत. एका एका रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे. तसे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
दादा, मामा, भैय्यांनी वाद कमी करावेत
जिल्हा रुग्णालयात फुकट पुढारपण करणारे भरपूर आहेत. आरोग्य सेवा देणाऱ्या लोकांशी छोट्या छोट्या कारणांवरून काही लोक हुज्जत घालत आहेत. जबरदस्ती उपचार करण्यास भाग पाडत आहेत. रुग्णांना मध्यस्थी करून चमकोगिरी करणाऱ्या दादा, मामा, भैय्या अशा लोकांनी आता वाद कमी करून प्रशासनाला मदत करावी, अशी मागणी होत आहे.
सीईओ देताहेत रुग्ण, नातेवाइकांना आधार
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे सुरुवातीपासूनच कोरोना वॉर्डमध्ये धाव घेतात. रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधण्यासह त्यांना आधार देण्याचे काम करतात. शुक्रवारीही ते कोरोना वॉर्डमध्ये राऊंड घेऊन आले. काही त्रुटी सुधारण्यासह नातेवाइकांना समजून सांगत होते. परिस्थितीला सर्व मिळून लढा देऊ, असे आवाहन कुंभार यांनी केले.
===Photopath===
230421\23_2_bed_3_23042021_14.jpeg~230421\23_2_bed_2_23042021_14.jpeg
===Caption===
फिवर क्लिनिकमध्ये बाकड्यावर बसवून महिलेला ऑक्सिजन लावले होते.~खाट नसल्याने जमिनीवर गादी टाकून वृद्धाला ऑक्सिजन लावले होते.