लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना खरीप पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. बीड जिल्ह्यासाठी शासनातर्फे १२६ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. दुष्काळी परिस्थिती, शेतक-यांनी शेतीवर केलेल्या खर्चानंतर झालेले नुकसान याचे गणित पाहिले तर जाहीर झालेली मदत अतिशय तोकडी असून थट्टा केल्यासारखी असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.दोन टप्प्यात हे अनुदान देण्यात येणार असल्याचे देखील शासन निर्णयात म्हटले आहे. पहिल्या टप्प्यासाठी बीड जिल्ह्याला १२६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र, खरीप हंगामात झालेल्या नुकसानीचा अंदाज जवळपास ७०० कोटींचा आहे. त्यामुळे दुष्काळात होरळणाºया शेतकºयांची शासनाकडून चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहेत.खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी अनुदान देण्याची तयारी राज्य सरकारकडून करण्यात आली आली आहे. खरीप पिकासाठी हेक्टरी ६ हजार ८०० तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी १८ हजार इतके अनुदान निश्चित केले आहे. मात्र, हे सर्व अनुदान शेतक-यांना एकरकमी मिळणार नाही. पहिल्या टप्प्यात ५० टक्केच अनुदानाचे वितरण होईल. त्यानुसार खरीप पिकांसाठी पहिला हप्ता हेक्टरी ३ हजार इतकी मदत सरकार करणार आहे. बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ९ हजार रुपये दिले जाणार आहेत. ही मदतही सरसकट नसून, ज्या शेतक-यांच्या सातबारावर पिकाची नोंद आहे त्या पिकाचे नुकसान ६७ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचे पीक कापणी प्रयोगातून समोर आले तरच हे अनुदान मिळण्यास शेतकरी पात्र राहणार आहे.बीड जिल्ह्यातील बहुतांश गावांची पैसेवारी ५० पैशाच्या पुढे होती. आता यातील काही गावांमध्ये विशिष्ट पिकांची पैसेवारी जर जास्त आलेली असेल तर अशा शेतक-यांना अनुदानातून वगळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रथम टप्प्यातील मदत पूर्णपणे वाटप झाल्यानंतर ३१ मार्चपूर्वी दुस-या हप्त्याची रक्कम देण्यात येणार असल्याचे अध्यादेशात नमूद आहे.सरसकट मदत देण्याची अजूनही मागणीजिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे खरीपासह रबी हंगाम देखील शेतक-यांच्या हाती लागला नाही.तसेच पेरणी व इतर शेतीच्या कामावर झालेला खर्च मिळणा-या मदतीपेक्षे पाच पट अधिक आहे.दुष्काळाच्या दाहकतेमध्ये होरपळणा-या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकट व मोठ्या प्रमाणात मदत देण्याची आवश्यकता असल्याच्या प्रतिक्रिया शेतक-यांनी दिल्या.दोन टप्प्यांत देणार मदतशेतक-यांना दिली जाणारी मदत दोन टप्प्यात देण्यात येणार आहे, ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रथम हप्ता प्रति हेक्टर ६८०० च्या निम्मे ३४०० रुपये तर बहुवार्षिंक पिकांसाठी प्रति.हे. १८ हजाराच्या निम्मे ९ हजार रुपये देण्यात येणार आहेत. ही मदत फक्त दोन हेक्टर वरील लागवडीसाठीच देण्यात येणार आहे.
दुष्काळी शेतकऱ्यांची पुन्हा चेष्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:38 AM