शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती, पैसेवारी जाहीर

By शिरीष शिंदे | Published: October 02, 2023 6:22 PM

पावसाने पाठ फिरविल्याने पिकांना बसला फटका

बीड : महसूल विभागाने हंगामी पैसेवारी जाहीर केली असून पावसाने पाठ फिरविल्याचा फटका पिकांना बसला असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्याची खरीप हंगामी पैसेवारी ४८.०७ जाहीर केली आहे. या पैसेवारीवरून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे मानले जात आहे. 

दुष्काळ जाहीर करण्यासाठी पूर्वी पैसेवारीचा आधार घेतला जात असे. परंतु आता वेगवेगळे निकष ग्राह्य धरून दुष्काळ जाहीर केला जातो. त्यात माती आर्द्रता, पीक कापणी प्रयोग, पाणी पातळी यासह इतर बाबींचा समावेश आहे. असे असले तरी पैसेवारी महत्त्वाची मानली जाते. महसूल विभागाने ३० सप्टेंबर रोजी हंगामी पैसेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पिकांचे नुकसान ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून सरासरी पैसेवारी ही ४८.०७ एवढी जाहीर करण्यात आली आहे. तालुकानिहाय आकडेवारीचे अवलोकन केले तर गेवराई तालुक्याची पैसेवारी ५४.१९ असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेवराई तालुक्यातील पिकांचे नुकसान अधिक असल्याचे दिसून येत आहे.

१४०३ गावांचा समावेशपैसेवारी काढण्यासाठी बीड जिल्ह्यातील १४०३ गावांचा समावेश करण्यात आला होता. पैसेवारी काढण्यासाठी पाहणी केलेले हेक्टर उत्पादन, प्रमाण उत्पादन पाहिले जाते. प्रत्येक प्रमुख पिकांचे किमान ६ कापणी प्रयोग घेण्यात येतात. पीक कापणी प्रयोगासाठी शेत निवडण्यासाठी कृषी विभागाची मदत घेतली जाते. पीक कापणी प्रयोग झाल्यानंतर पिकांच्या पेरणी क्षेत्राचे प्रमाण व कापणी प्रयोगाअंती आलेली पैसेवारी यांची भारांकित सरासरी काढली जाते. त्यानुसार महसूल गावाची पैसेवारी काढली जाते.

कृषी विभागाने पूर्वीच वर्तविला होता अंदाजजिल्ह्यात पावसाने दडी मारली असल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून पिकांची वाढ पावसाअभावी खुंटलेली आहे. परिणामी पीक परिस्थिती चिंताजनक आहे. एक महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड असल्याने उत्पादकतेत ५० टक्के घट होण्याची शक्यता कृषी विभागाने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच वर्तवली होती. बीड जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात २०२३-२४ मध्ये एकूण ७ लाख ८२ हजार ३०८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ही पेरणी जिल्ह्याच्या सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.५६ टक्के आहे. सद्यस्थितीला सोयाबीनवर पिवळा मोझॅक हा रोग पसरला असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

अशी आहे तालुक्यांची पैसेवारीबीड-४६.००आष्टी-४६.००पाटोदा-४६.५९वडवणी-४८.४०शिरुर-५०.७९गेवराई-५४.१९अंबाजोगाई-४८.००केज-४७.३७माजलगाव-४८.५७धारुर-४५.०३परळी-४७.८३एकूण- ४८.०७

टॅग्स :RainपाऊसBeedबीडdroughtदुष्काळ