बीड : परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या गरम रसाची टाकी फुटून मृत्यु पावलेल्या कर्मचार्यांची संख्या आता सात झाली आहे. आज सकाळी धनाजी राजेश्वरराव देशमुख यांचे उपचार चालु असताना निधन झाले.
वैद्यनाथ साखर कारखान्यातील टाकी फुटून झालेल्या दुर्घटनेत एकुण 12 जण जखमी झाले होते. बारापैकी दहा जणांना लातुरच्या लहाने हॉस्पीटलमध्ये तातडीने घटनेच्या दिवशीच उपचारार्थ दाखल केले. या दहाजणांपैकी एकुण 7 जणांचा मृत्यु झाला आहे. कारखान्यातील कर्मचारी सुभाष कराड (लिंबोटा), सुमित भंडारे, सुनिल भंडारे (देशमुख टाकळी), गौतम घुमरे (गाडे पिंपळगाव), राजाभाऊ नागरगोजे (मांडेखेल), मधुकर आदनाक (धानोरा) धनाजी राजेश्वरराव देशमुख यांचा मृतामध्ये समावेश आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात उसाच्या गरम रसाची टाकी फुटल्याने 12 जण गंभीर जखमी झाले होते . 12 पैकी 10 जणांना लातुरच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. या 10 पैकी मृत्यु पावलेल्यांची संख्या 7 झाली आहे. उर्वरीत जखमींवर उपचार चालु आहेत. धनाजी देशमुख यांचे रविवारी सकाळी 9 वाजता निधन झाल्याचे घोषित करण्यात आले, लातूरच्या फुलाबाई बनसोडे दवाखान्यात अभियंता त्यांची प्राण ज्योत मालवली. देशमूख यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन मुले, बहिणी असा परिवार आहे.