बीड : विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. जिल्ह्यातील पंचायत समित्यांसमोर ग्रामसेवकांनी धरणे दिली. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे.ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून पंचायत विकास अधिकारी अशी पदनिर्मिती करून वेतन त्रुटी दूर कराव्यात, २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास सज्जे तसेच पदे वाढवावी, जुनी पेन्श्न लागू करावी, आदर्श ग्रामसेवक , राज्य, जिल्हास्तर, आगाऊ वेतनवाढ करुन एक गाव एक ग्रामसेवक निर्मिती करणे, ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामे कमी करावीत या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.बीड पंचायत समितीसमोर तालुका युनियनचे अध्यक्ष सखाराम काशीद, उपाध्यक्ष सुषमा पाटील, कैलास घोडके, सचिव भाऊसाहेब मिसाळ, प्रविण तेलप, प्रविण सानप, महादेव खेडकर, बाबासाहेब चव्हाण, पुष्पराज इनकर, बालाजी साळुंके, रामेश्वर घोडके आदींसह ग्रामसेवक आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे कामकाज ठप्प झाले आहे.
ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे ग्रामपंचायतचा कारभार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:03 AM
विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले.
ठळक मुद्देकामबंद आंदोलन : विविध मागण्यांसाठी सुरू आहे आंदोलन