शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

मयत जन्मल्यामुळे ७५ वर्षीय आजीबाईनेच फेकले ‘ते’ अर्भक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 5:44 AM

कसलाही माग नसताना पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला

बीड : माणुसकीला काळीमा फसणारी आणि अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा तपास बीड शहर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसात पूर्ण केला आहे. स्त्री जातीचे मयत अर्भक जन्मल्यामुळेच आपण ते नालीत फेकून दिल्याची कबुली ७५ वर्षीय आजीबाईने दिली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कुठलाही धागादोरा नसल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर होते. परंतु त्यांनी यशस्वी करून दाखविले.२३ जुलै रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील उषा (वय२५, नाव बदललेले) या महिलेची जिल्हा रूग्णालयात प्रसुती झाली. परंतु तिच्या पोटी जन्मलेले स्त्री जातीचे बाळ मयत निघाले. डॉक्टरांनी हे बाळ नातेवाईकांच्या स्वाधीन केले. यावेळी उषा सोबत दगडाबाई (वय ७५ नाव बदललेले) या आजीबाई होत्या. उषाची प्रकृती स्थिर असल्याने ती लगेच झोपी गेली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास दगडाबाई उठल्या आणि मयत अर्भक पिशवीत टाकून जिल्हा रूग्णालयाबाहेर पडल्या. जुन्या एसपी आॅफिसजवळ गेल्यानंतर त्यांनी आजुबाजूला कोणी नसल्याची खात्री केली आणि अर्भक नालीत टाकून परतल्या. सकाळी दहा वाजेपर्यंत तर या अर्भकाचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडले. यामध्ये अर्भकाचा कंबरेपासून वरील भाग तुटला होता. याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी धाव घेत अर्भक ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.दरम्यान, या प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिसांना कसलाही क्ल्यू नव्हता. परंतु तपासअधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड यांनी पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरविली. जिल्हा रूग्णालयातील सर्व कागदपत्रे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना एक मयत अर्भकाची माहिती मिळाली. सूत्रांकडून माहिती घेत खात्री केली. त्यानंतर दगडाबाई यांना ताब्यात घेतले. त्यांनी आपणच हे कृत्य केल्याचा कबुली जबाब दिल्याचे सुलेमान यांनी सांगितले. शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दगडाबाईला न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.ही पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या कारवाई मार्गदर्शनाखाली पोनि सय्यद सुलेमान, पोउपनि मनिषा जोगदंड, राधा तुरूकमारे, गोरख गांधले यांनी केली.चार दिवसांत ६५ मुलींचा जन्मया प्रकरणाचा छडा लावण्यासाठी २० ते २४ जुलै दरम्यान किती मुली जन्मल्या, ही माहिती जिल्हा रुगणालयामधून पोलिसांनी काढली. यामध्ये ६५ मुली जन्मल्याचे समजले. तर २३ तारखेला पहाटे एक मयत अर्भक जन्मल्याचेही समजले. यावरच त्यांना संशय बळावला. खात्री केल्यानंतर पोलिसांचा अंदाज खरा ठरला.डीएनए तपासणी होणारआजीबाईने कबुली जबाब दिला असला तरी अर्भकाचे डीएनए घेतले असून ते तपासणीसाठी पाठविले जाणार आहेत. सध्या आजीबाईने कबुली जबाब दिला आहे. यात आणखी पुरावे जमा करणे सुरू असल्याचेही पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.

 

टॅग्स :Crimeगुन्हाBeedबीड