लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बस हळू का चालवतो? म्हणून एका प्रवाशाने वाहकास बेदम मारहाण केली़ ही शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बीड बसस्थानकात घडली. दोन दिवसांपूर्वीच एका महिला प्रवाशाने आपल्या नातेवाईकांच्या मदतीने बार्शी आगाराच्या वाहकाला शेकडो प्रवाशांच्या समोर बस थांबविली नाही. म्हणून मारहाण केली होती. वारंवार घडणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे कर्मचाºयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नितीन जगन्नाथ शिनगारे असे मारहाण झालेल्या वाहकाचे नाव आहे़ ते औसा आगारात कार्यरत आहेत़ शनिवारी सकाळी साडेदहा वाजता औरंगाबाद- औसा बस (क्ऱएमएच १८ बीएल- १८२१) मधून प्रवासी घेऊन ते बीड बसस्थानकात दाखल झाले़ यावेळी बीडमधील प्रवासी उतरले व नंतर पार्सल उतरविण्याचे काम सुरु होते़ वाहक नितीन शिनगारे बीड आगारात नोंदणी करुन परत बसजवळ आले तेव्हा प्रभू श्रीरंग भालकेर (रा़ वाळूज, औरंगाबाद) या प्रवाशाने त्यांना 'बस हळू का चालवतो?' असे म्हणून हुज्जत घालायला सुरुवात केली़
यावेळी दोघांत शाब्दिक चकमक उडाली़ त्यानंतर भालेकरने वाहक शिनगारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ चौकी पोलिसांनी तातडीने धाव घेत शिनगारे यांची सुटका केली़ शिवाजीनगर ठाण्यात मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला़ पोलिसांनी प्रभू भालेकरला अटक केली़ तपास पोहेकॉ शंकर राठोड व तुषार गायकवाड करत आहेत.
प्रभू भालेकर हा बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जात होता. लग्नाला वेळेत पोहचता येणार नाही, याची भिती त्याला होती. बीड बस्थानकात उतरल्याने त्याने गाडी हळू चालविण्यावरून वाद घातला. याचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.