बीड : तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबवली जात असून, ६६ कामे सुरु आ यामध्ये मानवलोक या सेवाभावी संस्थेचा देखील पुढाकार असून ३१ कामे त्यांच्यामार्फत सुरु आहेत. त्यामुळे येणाऱ्या पावसात धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.धरण क्षेत्रातील पाणी आटल्यानंतर किंवा मृत साठ्यात प्रकल्प गेल्यानंतर, त्या ठिकाणचा गाळ काढून शेतात ठाकण्यासाठी गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना सुरु करण्यात आली होती. यामुळे धरणातील गाळ कमी होऊन साठवण क्षमता वाढणार आहे. तर हा गाळ शेतात टाकल्यामुळे पिकांसाठी फायद्याचा ठरुन शेतातील उत्पादन वाढवून शेतकऱ्यांना लाभ होणार होणार आहे. प्रशासनाच्या वतीने २३३ कामे प्रस्तावित होती. त्यामध्ये जवळपास ४३ लाख ७७ हजार ३४३ घनमीटर एवढा गाळ निघेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात फक्त ६६ कामे सुरु झाल्यामुळे यामधून १६ लाख ६५ हजार ८८७ घनमीटर एवढी गाळाची माती आतपर्यंत काढण्यात आली आहे. त्यापैकी मानवलोक, भारतीय जैन संघटना व इतर सामाजिक संस्थेच्या वतीने ७ लाख ६४ हजार ७८९ घ.मी. गाळ काढण्यात आला आहे.जलसंधारण, पाठबंधारे विभाग, जिल्हापरिषद व इतर विभागाअंतर्गत येणाºया छोट्या मोठ्या २३३ प्रकल्पामंधून गाळ काढण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी फक्त ३५ ठिकाणी या विभागांच्या माध्यमातून, तर इतर ३१ ठिकाणी लोकसहभागातून काम सुरु आहे. ज्या ठिकाणी लोकसहभाग व साजिक संस्था गाळ काढण्याचे काम करत आहे. त्याठिकाणी योग्यरित्या काम सुरु आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाºयांच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे काही ठिकाणी गाळ हा शेतात न टाकता इतर व्यवसायिक कामासाठी वापरला जात असल्याची खात्रिशीर सूत्रांची माहिती आहे.पोषक मुलद्रव्य असलेली माती जाते वीटभट्टीसाठी४गाळाची माती ही शेतातील मातीपेक्षा अधिक उपजाऊ असते, ती माती शेततात टाकल्यानंतर पिकांना मोठ्या प्रमाणात पोषक द्रव्य मिळातात व पीक जोमात येते.४तसेच अशी पोषक माती तयार होण्यासाठी अनेक वर्ष जावे लागतात. परंतु ही पोषक माती शेतात न टाकता विटभट्टी चालकांकडून अवैधरित्या विटा तयार करण्यासाठी नेली जात आहे.४संबंधित अधिकाºयांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे विटभट्टी चालककाडून तळे तसेच धरणांमधील मातीचा गैरवापर होत आहे. याची वरिष्ठांनी दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाणीसाठा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:39 AM
तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही कोरडीठाक पडली आहेत, तर काही ठिकाणी मृत साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाच्या योजनेनुसार गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार योजना राबवली जात आहे.
ठळक मुद्देसेवाभावी संस्थांचा सहभाग : ६६ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू