जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व सध्या या वर्षात शेतक-याला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. सुशी वडगाव येथील स्व.माणिकराव काळे पाटील सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा प्रशासनाने शासनाच्या मंजुरीनुसार जातेगाव येथे गुरांची छावणी सुरु केली.छावणीत महिनाभरात जनावरांची संख्या दुप्पट झाली आहे. सध्या या वर्षी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन शासन प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे. जातेगाव सर्कलमध्ये तीन ते चार चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जातेगाव येथील चारा छावणीत मोठे ६४० व लहान ९५ अशी ७३५ जनावरे आहेत. चारा छावणीत प्रति दिन मोठ्या जनावराला ओला चारा १५ किलो तर लहान जनावराला ६ किलो दिला जातो. सकाळ- संध्याकाळ दोन वेळेस पेंड मोठ्या जनावराला १ किलो, लहान्याला अर्धा किलो पेंड दिली जात असल्याचे छावणी चालकांनी सांगितले. परिसरातील टाकरवण, कांबी, सिरसदेवी, रोहितळ, मुधापुरी या ठिकाणी चारा छावण्या सुरु आहेत. मात्र याठिकाणी छावणी नव्हती.
जातेगाव येथे चारा छावणी सुरू झाल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 11:41 PM
गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने व सध्या या वर्षात शेतकºयाला दुष्काळाशी सामना करावा लागत आहे.
ठळक मुद्देसुशी वडगाव येथे छावणी : छावणीचा ७३५ जनावरांना आधार; शेतकऱ्यांची सोय