लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे. तर दुसरीकडे बाजारातील तेजी- मंदीचा फरक लक्षात येत नसल्याने शेतकºयांना बाजारमुल्याच्या तुलनेत आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.यावर्षी दुष्काळजन्य स्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्याच्याकडील माल खरेदी करण्यासाठी गाव पातळीवर बाजारात तसेच गावोगावी शेतकºयांच्या दारात अनेक व्यापारी फिरत आहेत. हे खरेदीदार मापात पाप करुन विकत असतानाही केवळ बाजारात माल नेईपर्यंत लागणारा खर्च वाचविण्याच्या लालसेने गरजू शेतकरी माल विकत आहेत.आतापर्यंत कापूस खरेदीसाठी अनेक दलाल गावोगावी वाहने आणून खेडा पध्दतीने खरेदीसाठी फिरत होते. मात्र यावर्षी अन्नधान्य खरेदीतही अनेक व्यापारी उतरले आहेत. बाजारातील तेजीचा अंदाज येत नसल्याने शेतकरी कानावर पडलेल्या भावात त्याचा माल विकत आहेत. परिणामी बाजार समितीमध्ये अन्नधान्य व परवानाधारकांकडे कापसाची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे.खेडा पद्धतीचा असा आहे तोटाकापूस व अन्नधान्य विकणाºया शेतकºयांना तेजीमंदी लक्षात येत नाही. ते कळण्याआधीच माल विकलेला असतो. वजन काटा प्रमाणित नसल्याने खरेदीदार घोळ करु शकतात. वजन कमी दाखवून खरेदी करतात. त्यामुळे आर्थिक फटका बसू शकतो.परवानाधारक व्यापाºयांना माल विकल्यास त्याची रितसर पावती घेता येते. शासनाकडून अनुदानाची घोषणा केल्यास त्याचा फायदा परवनाधारक व्यापाºयाला माल विकून अधिकृत पावत्या असलेल्या शेतकºयांना होऊ शकतो.परवानाधारक लटकलेखेडा पद्धतीने खरेदी करणाºयांच्या भाऊगर्दीमुळे बाजारसमितीमध्ये माल आणण्यास कोणीच उत्सुक नाहीत. परिणामी शासकीय व बाजार समितीचे शुल्क भरुन परवाना घेणाºयांना मार्केट यार्डात माल येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे.
खेडा पद्धतीने व्यापारामुळे मोंढ्यात घटली आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:48 PM
दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे
ठळक मुद्देबीडमध्ये विना परवाना खरेदी -विक्रीचा जोर : परवानाधारक व्यापाऱ्यांसह शेतकरी, बाजार समितीला आर्थिक फटका