लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.वादळी वारा व पावसामुळे नागरिकांना उकाडयापासून दिलासा मिळाला. मात्र बारा विद्युतखांब पडले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सारडगाव, धर्मापुरी, उजनी, पट्टीवडगाव ३३ केव्ही सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विहिरी, बोअरची पाण्याची पातळी खालावली असून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पाणी शोधणे अवघड झाले आहे. सतर ते ऐंशी फुटापर्यंत शेतकºयांनी विहिरीचे खोदकाम केले. एकाही शेतकºयाच्या विहिरीला पायरी नसल्याने पाणी बघत बसणे हाच प्रयत्न शिल्लक राहिला आहे. तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी उन्हाची पर्वा न करता ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. तर विजेअभावी अनेक गावांमध्ये पिठाच्या गिरण्या गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वादळी वाºयामुळे झाडाच्या फांद्या तारेवर मोडून पडल्यामुळे काही ठिकाणी ताराही तुटल्या आहेत. ४८ तास उलटून गेले तरी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे कामात दिरंगाई होत असल्यामुळे पन्नास गावच्या ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.वादळामुळे झाडे तारांवर पडल्याने नुकसानया संदर्भात महावितरणचे सहाय्यक अभियंता राजेश अंबेकर यांच्याकडे विचारणा केली असता जिथे जिथे विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. तिथे कामे सुरू आहेत. मात्र वादळी वाºयामुळे मोठी झाडेदेखील विद्युत तारांवर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. येत्या दोन दिवसांत प्राधान्यक्रम देऊन ती कामे पूर्ण करण्यात येतील, असे अभियंता अंबेकर म्हणाले.
वीज खंडित झाल्याने अंबाजोगाई तालुक्यातील ५० गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:15 AM
अचानक आलेले वादळी वारे व पावसामुळे शुक्रवारी मुख्य लाईनचे विद्युत खांब मोडून पडले असून चार ३३ केव्ही सबस्टेशन बंद पडल्यामुळे ५० गावे अंधारात आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे.
ठळक मुद्देपाणीप्रश्न गंभीर : विजेअभावी जनजीवन विस्कळीत