बीड : जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. तरी देखील शेतकºयांना विकत घेऊन जनावरांना कडबा खाऊ घालावा लागत आहे. त्यामुळे शेतकºयांना दुष्काळात देखील आर्थिक भार सहन करावा लागत आहे.जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीमुळे प्रशासनाकडून सुरु केलेल्या जवळपास ६०० छावण्यांवर ४ लाखापेक्षा अधिक जनावरे आहेत. त्यांना चारा म्हणून ऊस दिला जातो. जनावरांनी मोठ्या प्रमाणात उसाचा चारा खालल्यामुळे दुधाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे चारा छावण्यांवर उसाच्या चाºयासोबत शेतकरी स्वखर्चाने ज्वारीचा कडबा जनावरांना खाऊ घालत आहेत. मात्र, यावर्षी दोन्ही हंगामात दरवर्षीच्या तुलनेत चारा निर्मिती कमी झाली आहे. हीच संधी साधत सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, अहमदनगर सह इतर जिल्हे व परराज्यातील व्यापाºयांकडून ज्वारीचा कडबा शेकडा ३३०० ते ३५०० रुपये अशा चढ्या दराने विक्री केली जात आहे. बीड शहर व परिसरात रोज लाखों कडब्याच्या पेंड्यांची विक्री केली जात आहे. त्यामुळे चार छावण्या सुरु होऊन देखील शेतकºयांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. चारा छावण्यांवर देखील कडबा तसेच इतर चारा जनावरांसाठी उलब्ध करुन देण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.रोज येतो १०० ट्रक-ट्रॅक्टर कडबारोज बीडसह इतर तालुक्यात १०० ट्रक व ट्रॅक्टरच्या माध्यमातून कर्नाटक व सोलापूर, पंढरपूर, मोहोळ,कोल्हापूर यासह इतर जिल्ह््यातून कडब्याच्या पेंड्यांनी भरुन येतात. याठिकाणी आल्यानंतर शेतकरी कडब्याची प्रत, पेंडी मोठी आहे का याची खात्री करुन व्यापारी व शेतकरी भाव ठरवतात. हजार-बाराशे रुपये भाव असलेल्या कडब्याला ३३०० आणि ३५०० रुपये मोजवे लागत असल्याचे शेतकºयांमधून सांगण्यात आले.
दुष्काळात कडबा साडेतीन हजार पार, शेतकरी बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:37 AM
जिल्ह्यातील मागील दोन वर्षात पावसाचे प्रमाण हे अत्याल्प आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत.
ठळक मुद्देजनावरांच्या आरोग्यावर परिणाम : उसाच्या चाऱ्यामुळे दूध उत्पादनात देखील झाली घट