रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील हिंगणी ते नांदूर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक दिवसांपासून रस्ता दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्ता तातडीने दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.
वीजपुरवठा खंडित
बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
इंटरनेट सेवा विस्कळीत
बीड : मागील काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील अनेक मार्गांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा यामुळे अपघात झाल्याची उदाहरणे आहेत. जनावरांच्या बंदोबस्ताची मागणी होत आहे.